पाणी बचत काळाची गरज - स्वयंशिक्षण प्रयोग धाराशिव
धाराशिव : मराठवाडा जिल्हा परिवर्तन मॉडेल अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील सहा तालुक्यात स्वयं शिक्षण प्रयोग संस्था 320 गावांमध्ये काम करत आहे .शेती आणि पाणी या विषयावर मार्गदर्शन करत आहे . कळंब तालुक्यातील वाघोली या गावांमध्ये ग्रामस्थांच्या सहभागातून श्रमदान करण्यात आले. शेतकऱ्यांना पाण्याचे महत्व व पाणी व्यवस्थापन याबाबत माहिती सांगण्यात आली.दुष्काळग्रस्त परिस्थितीवर आपण कशाप्रकारे मात करू शकतो यावर ग्रामस्थांसोबत गोदावरी मॅडम यांनी चर्चा केली.त्यानंतर ग्रामस्थांनी "आम्ही सर्व गावकरी या श्रमदानात सहभागी होऊन आमच्या गावातील पाणी आमच्या गावात राहायला पाहिजे,यासाठी आम्ही सर्व गावकरी श्रमदान करण्यास तयार आहोत", असे त्यांनी अभिवचन दिले.यावेळी वाघोली गावचे सरपंच सौ.साखरबाई रामभाऊ काळे ,उपसरपंच - श्री.क्रांतीलाल भिवाजी धोंगडे ,ग्रामसेवक- सौ.सरोजन सरवदे ,ग्रामपंचायत सदस्य - श्री.लक्ष्मण धोंगडे, सौ.उषा तौर, ग्रामस्थ -श्री.माधव देशमुख बापू धोंगडे तसेच स्वयं शिक्षण प्रयोग चे गोदावरी क्षिरसागर मॅडम ,अभिजीत सर यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांना जलसंधारणाचे महत्त्व पटवून देण्यात आले यावर्षी पडलेला कमी पाऊस व येणारी गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले .तसेच या श्रमदानातून समतल चर खोदण्यात आले यावेळी तालुका समन्वयक कु.प्रियदर्शनी कांबळे , सौ.प्रियंका कोल्हे तसेच स्वयं शिक्षण प्रयोग च्या सखी सौ .लक्ष्मी अनिल काळे , सौ.आशा कसबे , सौ.वैशाली खंडागळे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments