Hot Posts

6/recent/ticker-posts

परमात्म्याच्या चिंतनातच सुख, शांती, समाधान - हभप कोकाटे महाराज|Happiness, peace, contentment only in contemplation of God - Habhap Kokate Maharaj

परमात्म्याच्या चिंतनातच सुख, शांती, समाधान - हभप कोकाटे महाराज,श्री दत्त नाम सप्ताह सोहळ्याची काल्याचे कीर्तन, महाप्रसादाने सांगता
पालखी, गुरूचरित्र भव्य दिंडी मिरवणूक
दिगंबरा, दिगंबरा  दत्त नामाने सद्गुरू नगरी दुमदुमली


धाराशिव: परमात्म्याच्या चिंतनातच सुख, शांती,समाधान आहे़ जे परमात्म्याचे नाम घेतात़ त्याचे गीत गातात व त्याच्या नामाचा आनंदाने जयघोष करतात़त्यांचे दोष आपोआप हरले जातात़ त्यांच्या पदरी पुण्य येते असे प्रतिपादन रामायणाचार्य हभप भारत कोकाटे महाराज यांनी केले़.

धाराशिव शहरातील श्री सद्गुरू कॉलनी, भानुनगर येथे भगवान श्री गुरुदेव दत्तात्रेय महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त  पिताश्री श्रीमंतराव रणदिवे (आबा) प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित श्री दत्त नाम सप्ताह सोहळ्यात मंगळवारी (दि़ २६) हभप कोकाटे महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले़ यावेळी त्यांनी

कृष्ण गोकुळी जन्मला । दुष्टां चळकांप सुटला ।।

होता कृष्णाचा अवतार । आनंद करिती घरोघर ।।

या संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर निरूपण केले़ ते म्हणाले, श्रीकृष्णाचा  जेव्हा गोकुळात जन्म झाला तेव्हा  दुष्टांचा थरकाप उडाला़ कृष्णाचा अवतार होताच लोक आनंदी झाले़ जगाच्या उध्दारासाठीच परमात्मा अवतार घेत असतो़, असे प्रतिपादन त्यांनी केले़ यावेळी हभप कोेकाटे महाराज यांच्या हस्ते दहीहंडी फोडून काल्याचे वाटप करण्यात आले़ काला व महाप्रसाद वाटपाने या सप्ताह सोहळ्याची सांगता करण्यात आली़ 


यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी आभार मानले यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते़ सप्ताह सोहळ्यानिमित्त १९ ते २६ डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम भक्तीमय वातावरणात संपन्न झाले़ सोमवारी (दि़२५) सायंकाळी भजनसंध्या कार्यक्रम घेण्यात आला़ यावेळी हभप शिवकुमार मोहेकर यांनी भक्तीगितांचे उत्कृष्ट सादरीकरण केले़ मंगळवारी पहाटे श्री दत्तगुरूंच्या जन्मोत्सवानिमित्त अभिषेक करण्यात आला़ सकाळी टाळ, मृदंगाच्या गजरात भव्य गुरूचरित्र ग्रंथदिंडी  काढण्यात आली़ भाविकांनी उत्स्फूर्तपणे या मिरवणुकीत सहभाग घेतला़ ठिकठिकाणी या दिंडीच्या स्वागतासाठी महिलांनी रस्त्यावर रांगोळी काढली होती़.


 सदगुरु  रामानंद महाराज वारकरी शिक्षण संस्था काजळा, हभप रावसाहेबबाबा पाटील महाराज शिक्षण संस्था मेडसिंगा, श्री संत नारायणबाबा रामजीबाबा वारकरी शिक्षण संस्था वाणेवाडी येथील  बालवारकºयांनी टाळमृदंगाच्या गजरात  अभंगाच्या तालावर रिंगण करून उत्कष्ट सादरीकरण केले़ आ़ राणाजगजितसिंह पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, यशवंत मल्टीस्टेटचे चेअरमन सतीश दंडनाईक, उस्मानाबाद जनता बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे, राजसिंह राजेनिंबाळकर यांनी या सप्ताह सोहळ्यास भेट दिली़

Post a Comment

0 Comments