Hot Posts

6/recent/ticker-posts

उमरगा : तलमोड केंद्रीय प्राथमिक शाळाच्या दुरुस्तीच्या कामा संदर्भात बाळकृष्ण गोरे यांचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू| Umarga: Balkrishna Gore is on fast to death in front of Zilla Parishad office regarding the repair work of Talmod Central Primary School.

उमरगा : तलमोड केंद्रीय प्राथमिक शाळाच्या दुरुस्तीच्या कामा संदर्भात बाळकृष्ण गोरे यांचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू|




धाराशिव : उमरगा तालुक्यातील तलमोड येथील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीच्या कामासंदर्भात बाळकृष्ण गोरे यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे . या निवेदनात असे म्हटले आहे की , केंद्रीय प्राथमिक शाळा तलमोड तालुका उमरगा येथील केंद्रीय प्राथमिक शाळा दुरुस्ती करिता सुदर्शन सुशिक्षित बेकार मजूर सहकारी संस्थेस दुरुस्तीसाठी काम दिले होते या संस्थेने शासनाच्या नियमानुसार केंद्रीय प्राथमिक शाळा दुरुस्ती कामाच्या लोकवाट्याची रक्कम शालेय व्यवस्थापन कमिटी तलमोड यांच्या खात्यावर तीन लाख 50 हजार रुपये रक्कम जमाही केली आहे परंतु तीन महिने झाले तरीही शालेय व्यवस्थापन अध्यक्ष व मुख्याध्यापक केंद्रीय प्राथमिक शाळा तलमोड हे जिल्हा परिषद यांच्याकडे वर्ग करत नसल्याने हे काम अपूर्ण आहे हे काम दुरुस्त करण्यात येत नाही .

तरी शालेय व्यवस्थापन अध्यक्ष व मुख्याध्यापक यांनी ही रक्कम तात्काळ जिल्हा परिषद यांच्याकडे वर्ग करावी या मागणीसाठी सुदर्शन सुशिक्षित बेकार मजूर सहकारी संस्थेचे चेअरमन बाळकृष्ण भीमराज गोरे यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत सदरील शाळेचे मुख्याध्यापक व शालेय व्यवस्थापन अध्यक्ष ही रक्कम जिल्हा परिषद यांच्याकडे वर्ग करत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.


















आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बालाघाट न्युज टाइम्स या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा

👇👇👇👇👇👇👇👇

Post a Comment

0 Comments