नातेपुते येथे रिपाईं व होलार समाज संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिन साजरा करून प्रा. गुळीग व पत्रकारांच सन्मान
नातेपुते प्रतिनिधी : रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडिया (आ) व अखिल भारतीय होलार समाज संघटना यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनानिमित्त व प्रा. ज्ञानेश्वर गुळीग यांची (मा विश्वासराव रणसिंग महाविद्याल कळंब कला, वाणिज्य आणि विज्ञान) येथे उपप्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल आणि पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.आलेल्या पाहुण्यांचे स्वागत कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष किसनराव ढोबळे यांनी केले प्रथमता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.रिपाईंचे ता सरचिटणीस रोहीत सोरटे यांनी प्रस्ताविक केले. व सुनिल ढोबळे यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच दलित पँथरचे अध्यक्ष श्रावण सोरटे व कारुंडे गावच्या नुतन सरपंच नंदा नामदास यांचा सत्कार करण्यात आला.आलेल्या पत्रकारांचा रिपाई व अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष युवराज वाघमारे, प्रमुख मार्गदर्शक नंदकुमार केंगार(अ भा होलार समाज संघटना प्रदेशाध्यक्ष) नातेपुते एज्यूकेशन सोसायटीचे चेअरमन धैर्यशिल देशमुख,प्राचार्य अंकुशराव आहेर,प्राचार्य सी बी कोळेकर,रिपाईंचे नेते बापुसाहेब जगताप,हैदर केंगार,व उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग यांनी आपले मनोगत व्यक्त केले.व सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रा. ज्ञानेश्वर गुळीग यांचा नागरिक सत्कार करण्यात आला.व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमास मधुकर भंडगे,बळवंत माने, विनोद रणदिवे, प्रा. सोमनाथ ऐवळे,विशाल सोरटे,शिवाजी होनमाने,शंकर ढोबळे,प्रितम साळवे,विनित सोरटे,गणेश जाधव,प्रकाश साळवे,अभिषेक साळवे,सुगत सोरटे,राहुल सोरटे,राज साळवे,तोहीत शेख,यश काकडे,सौरभ साळवे,निखिल सोरटे,प्रशांत साळवे व रिपाई आणि अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.आभार संघर्ष सोरटे यांनी मानले.
0 Comments