लॉजवर नेऊन महिलेवर अत्याचार, तरुणावर गुन्हा दाखल
सोलापूर : विवाह तिच्या असह्यतेचा लाभ उठून तिच्या शी ओळख वाढवून फसवून रिक्षा मधून लॉजवर नेऊन बळजबरीने अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात मंगळवारी दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी कृष्णा उर्फ तम्मा खानापुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळाली सविस्तर माहिती अशी की शहरातील एका परिसरातील संशयित आरोपीची पीडीता व तिच्या पतीशी ओळख झाली पिढीता व तिचे पती हाऊस कीपिंग चे काम करून कुटुंबाची उदरनिर्वाह करतात. संशयित आरोपी हा एक डिसेंबर रोजी पिढी तिच्या कामाच्या ठिकाणी गेला तिथून महत्त्वाचे काम आहे असे म्हणून रिक्षा मधून एका लॉजवर नेले. तिथे तू मला आवडतेस तुझा नवरा भोळसर आहे मी तुझा सांभाळ करतो असे म्हणत जबरदस्तीने मारहाण करून अत्याचार केला. त्यानंतर ही 15 जानेवारीपर्यंत वारंवार धमकी देऊन त्याने अशी कृती केल्याची फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस आयुक्तासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद्ध दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी पिढी तिचे भेट घेऊन तिची कैफियत जाणून घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जेऊघाले करीत आहेत.
0 Comments