Hot Posts

6/recent/ticker-posts

राज्यात वकील संरक्षण कायदा लागू करा, उच्च न्यायालयात जनहित याचिका

राज्यात वकील संरक्षण कायदा लागू करा, उच्च न्यायालयात जनहित याचिका

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील वकील दांपत्याची झालेली हत्या व त्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढणाऱ्या वकिलावर पोलिसांनी केलेला लाठी मार या पार्श्वभूमीवर राज्यात वकील संरक्षण कायदा लागू करण्याबाबत सरकारला निर्देश द्या, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. विधीज्ञ नितीन सातपुते यांनी विधिज्ञ शोभा बुद्धिवंत यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी मनीषा आढाव यांची 27 जानेवारी रोजी अपहरण करण्यात आले तसेच त्यांच्याकडून पाच लाखाची खंडणी मागत हत्या करण्यात आली या घटनेने वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील हजारो वकिलाने आझाद मैदानात धडक दिली. बार असोसिएशनच्या सदस्यांनी निदर्शने करतानाच महाराष्ट्र वकील संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी केली यावेळी पोलिसांच्या फौजपाठ्याने मैदानाभोवती बॅरिकेट्स उभे करून वकिलांना बेकायदेशीर रित्या ताब्यात घेण्यात आले. त्याचबरोबर लाठीमार ही करण्यात आला याप्रकरणी जबाबदार पोलिस अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाईची निर्देश द्या अशी विनंती याचिकेतून केली आहे.

Post a Comment

0 Comments