यंदा आंब्याला उशिरा मोहर, बदलत्या वातावरणाचा फटका
धाराशिव : यंदा धाराशिव जिल्ह्यामध्ये सुरुवातीपासूनच अत्यल्प कमी पाऊस पडल्यामुळे यंदा थंडीचे प्रमाणही कमी आहे बदलत्या वातावरणामुळे कधी थंडी, कधी ढगाळ वातावरण यामुळे आंब्याच्या झाडाला मोहर येण्यास उशीर झाला आहे, तर मागील पंधरा दिवसापासून पडत असलेल्या थंडीमुळे आंब्याच्या झाडांना मोहर येण्यास सुरुवात झाली आहे. एकंदरीत आंब्याला नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यांमध्ये मोहर येण्यास सुरुवात होतो मात्र यंदा तब्बल दोन महिन्यांनी मोहर येण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे यंदा गावरान आंबा यावर्षी उशिरा बाजारात येणार आहे. यावर्षी निसर्गामध्ये झालेल्या बदलांना शेतकरी वर्ग सामोरे जात आहे. प्रत्येक वेळेस पिक चांगले येते तर भाव मिळत नाही आणी कधी भाव असला तर शेतीमाल विक्री नसतो. त्यामुळे शेतकरी पुरता हवालिदल झालेला आहे. परिसरातील शेतकरी अवकाळी पाऊस, कधी बेसुमार थंडी, कधी गारपीट आता फेब्रुवारी महिन्यात कमालीचे तापमान वाढल्यामुळे शेतकरी वर्ग अत्यंत मेटाकुटीला आलेला आहे. कांद्याला भाव नाही. वातावरणातील बदलामुळे द्राक्ष बागानाही रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे द्राक्षही सध्या कवडीमोलाने विक्री होत आहे.
त्यामुळे चोहीकडुन शेतकरी नुकसान ग्रस्त आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे त्यात आंब्याला आलेला मोहर अचानक वातावरण बदल झाला तर खडतो की काय या भीतीमध्ये शेतकरी राजा सापडला आहे.
0 Comments