नवऱ्याने बायकोला मोबाईलवर शिवीगाळ करून दिली धमकी, नवीन कायद्यानुसार नवऱ्याविरुद्ध बायकोची तक्रार|
सोलापूर: भारत सरकारच्या नवीन कायद्यानुसार नवऱ्याने मोबाईलवर बायकोला शिवीगाळ करून धमकी दिल्याच्या तक्रारीवर नवराविरूध्द अकलूज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
आहे याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारपासून भारतीय संसदेत जुन्या कायद्यात बदल करून पारित झालेल्या नवीन कायद्याचा अंमल सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पारू गोपाळ पवार (रा. संग्राम नगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर )यांनी एक जुलै 2024 रोजी त्यांच्या मोबाईल नंबर वर गोपाळ बाबू पवार यांनी शिवीगाळ करून धमकी दिली याची तक्रार दिली यामुळे भारतीय न्याय संहिता 2023 बीएनएस चे कलम 351 (4) प्रमाणे गोपाळ पवार पोलीस ठाण्यात पहिला अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा पोलीस हवालदार ठोंबरे यांनी दाखल करून पुढील कारवाईसाठी पोलीस हवालदार अभिजीत कुंभार यांच्याकडे देण्यात आला आहे.
0 Comments