धाराशिव तालुक्यातील पाडोळी येथील अंगणवाडीच्या खाऊ मध्ये निघाला चक्क मेलेल्या बेडूक-
धाराशिव: धाराशिव तालुक्यातील पाडोळी (आ) येथील अंगणवाडीत लहान बालकांसाठी पुरविण्यात आलेल्या पॅकेट बंद खाऊमध्ये चक्क मेलेला बेडूक निघाल्याने बालकांचे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे याबाबत माहिती मिळताच स्थानिक पदाधिकारी तसेच पालकांनी अंगणवाडीत जाऊन पाहणी करत पुरवठादार कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अंगणवाडीमध्ये दर महिन्याला तुरडाळ खिचडीचे पॅकेट सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील लहान मुलांना खाऊ वाटप करण्यासाठी पुरविण्यात येते. त्यानुसार धाराशिव तालुक्यातील पाडोळी येथे अंगणवाडीत लहान बालकांना खाऊ वाटप करत असताना चक्क त्या खाऊत मेलेला बेडूक निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा होऊ शकली असती, याबाबत माहिती समजतात सतीश एकंडे यांच्यासह पालकांनी अंगणवाडी येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून पंचनामा करून घेतला या घटनेमुळे पालकांमध्ये अंगणवाडीतील खाऊबाबत संशय निर्माण होताना दिसत आहे.
0 Comments