Hot Posts

6/recent/ticker-posts

ह्रदयद्रावक घटना : रक्षाबंधनासाठी बहिणीला गावी नेताना भीषण अपघात; बहीण-भावावर काळाचा घाला पंढरपूर मंगळवेढा मार्गावर भीषण अपघात|Rakshabandhan

ह्रदयद्रावक घटना : रक्षाबंधनासाठी बहिणीला गावी नेताना भीषण अपघात; बहीण-भावावर काळाचा घाला पंढरपूर मंगळवेढा मार्गावर भीषण अपघात



सोलापूर : रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला बहिण भावावर काळाचा घाला घातल्याची घटना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा रोडवर दिनांक 18 रोजी घडली आहे. रक्षाबंधन सण बहीण-भावाच्या या प्रेमळ नात्यानं सोशल मीडियाही गजबजलेला पाहायला मिळत आहे. मात्र, अशातच सोलापूर  जिल्ह्यातून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये, रक्षाबंधन सणासाठी गावाकडे घेऊन येणाऱ्या कारचा अपघात झाल्याने बहीण-भावाचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे.    

रक्षाबंधन सणासाठी आलेल्या बहिणीला कारमधून गावाकडे घेऊन जात असताना झालेल्या भीषण अपघातात दोघा बहिण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पंढरपूर मंगळवेढा मार्गावर गोपाळपूर हद्दीत रविवारी साडेचार वाजता घडली आहे पंढरपूरहून मंगळवेढ्याकडे निघालेली कार क्रमांक एम एच 13 बी 66 49 ची पंढरपूरकडे येत असलेला टेम्पो आर जे 36 जीए 59 71 ला समोरासमोर जोरदार धडक बसली त्यामध्ये कारचा चकाचूर झाला असून शिफ्ट कार मधील बहिण भाऊ जागेच ठार झाले आहेत.

मंगळवेढा येथील रोहित तात्यासो जाधव वय 25 ऋतुजा तात्यासो जाधव वय 19 अशी मयत बहीण भावाची नावे आहेत दोघांचे मृतदेह पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे शवाविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत मात्र रक्षाबंधनाच्या सणाच्या पूर्वसंख्येलाच काळाने घाला घातल्याने  सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments