कोल्हापूर : लग्न लावून देतो म्हणून चार लाख 16 हजार रुपयांची फसवणूक करून पसार झाल्या प्रकरणी राधा देशमुख उर्फ सोनाली कोल्हाळ (राहणार मोहोळ जिल्हा सोलापूर) सुवर्णा अमोल बागल ,अमोल शिवाजी बागल दोघे राहणार नाईकवडी वस्ती मोहोळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या तिघांना राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
बारडवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथील पांडुरंग गजानन बारड यांनी त्यांचा भाऊ रमेश यांचे लग्न राधा हिच्याशी जुळवून देण्यासाठी सुवर्णा बागल व अमोल बागल यांना रोख एक लाख 60 हजार रुपये दिले होते त्यानंतर राधा व रमेश बारड यांचा 26 एप्रिल 2024 मध्ये विवाह झाला विवाह प्रसंगी श्रीधर म्हणून राधा उर्फ सोनाली हिला लग्नात सोने चांदी असे दोन लाख 56 हजार किमतीचे दागिने घातले पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी राधा देशमुख (नवरी) ही दागिन्यासहित पांडुरंग बागल यांच्या बहिणीचीही दागिने व लग्नपूर्वी दिलेली रक्कम असे एकूण चार लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाली.
0 Comments