लालपरीची चाके थांबल्याने प्रवाशाची गैरसोय, विविध मागण्यासाठी धाराशिव एसटी कर्मचाऱ्यांचा संप
धाराशिव: सर्वसामान्यांच्या दळणवळणाचे प्रमुख साधन असलेल्या एसटीच्या चालक वाहक कर्मचारी यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा सरकारला दिला होता त्यावर तोडगा न निघाल्यामुळे मंगळवारी आंदोलन सुरू केले या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे या आंदोलनामुळे येथील आगारातून सकाळपासूनच एकही एसटी बस बाहेर पडली नाही परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
एसटी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे एसटीची चाकी जागेवरच थांबली असून कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांसह प्रवासी व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय सुरू आहे. येथील आगारातील एकही एसटी बस बाहेर पडली नाही येथील बस स्थानकाच्या बाहेर चालक वाहक व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत कामगार एकजुटीचा तसेच सरकार विरोधी घोषणा दिल्या. टप्प्याटप्प्याने इतरही सर्व कर्मचारी आंदोलनास सहभागी होतील असे हे कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले एसटी आगारातून दररोज ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रवासासाठी पहाटेपासून एसटी सेवा सुरू असते मंगळवारी सकाळपासूनच एसटीची सेवा बंद राहिल्याने ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला येत आले नाही. त्यामुळे त्यांना शैक्षणिक नुकसानी सामोरे जावे लागले काम बंद आंदोलन सुरू केल्याने एसटी यंत्रणा बंद राहिली प्रवाशांना खाजगी प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला आहे. तर काही ठिकाणी खाजगी वाहनाने जाणे आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याने प्रवाशांना घराकडे परत फिरावे लागले.
512 बस फेऱ्या रद्द
जिल्ह्यात एसटी कामगारांच्या संपामुळे एसटी प्रशासनात दुपारी चार वाजेपर्यंत 634 पैकी तब्बल 512 फेरा रद्द करावे लागले आहेत तर 122 फेऱ्या सुरळीतपणे पार पडले आहेत जिल्ह्यातील एकूण 2473 पैकी 114 एसटी कामगारांनी संपात सहभाग घेतला आहे या संपामुळे जिल्ह्यात एसटी महामंडळाचे जवळपास 22 लाख रुपयांची नुकसान झाल्याची माहिती विभागीय कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.
0 Comments