Hot Posts

6/recent/ticker-posts

यंदा राज्यातील साखर कारखान्याचा 15 नोव्हेंबर पासून ऊस गाळप हंगाम सुरू


मुंबई: राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम येथे 15 नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय सोमवारी मंत्रालयात मंत्रिमंडळ उपस समितीच्या बैठकीत घेण्यात आला साखर कारखान्यांनी आणि साखर आयुक्तालयाने त्यानुसार कारवाई करावी अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या साखर संकुल ते एक बांधणीसाठी केली जाणारी प्रति टन 50 पैसे कपात यावर्षेपासून रद्द करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे.

बैठकीला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा,वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, साखर आयुक्त डॉक्टर कुणाल खेमकर महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी आर पाटील साखर कारखाना संघाची संचालक प्रकाश आवाडे वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बेबी ठोंबरे साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे उपस्थित होते. या बैठकीत ऊस गाळप आढावा आणि हंगाम नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली यावर्षी ऊस लागवडीचे प्रमाण कमी आहे दिवाळी विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तारखा गृहीत धरून हंगाम सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा झाली असून त्यांनी 15 नोव्हेंबर पासून हंगाम सुरू करण्यास मान्यता दिली असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments