Hot Posts

6/recent/ticker-posts

शिर्डीच्या मंदिरातील हार व फुले नेण्याच्या ठरावाला खंडपीठात मंजुरी, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

शिर्डीच्या मंदिरातील हार व फुले  नेण्याच्या ठरावाला खंडपीठात मंजुरी, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय



छत्रपती संभाजीनगर: शिर्डी येथील श्री साई संस्थांच्या मंदिरात साईबाबांच्या मूर्तीला फुले आणि हर हर पण करण्यासाठी संस्थांशी संबंधित कर्मचारी सहकारी संस्थेने मापक दराचे भाविकांना उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या ठरावाला मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील आणि न्यायाधीश शैलेश ब्रह्मे यांनी मंजुरी दिली.

संस्थांकडून दाखल जनहित याचिकेत विविध दिवाणी अर्ज दाखल करण्यात आले होते त्यावर सुनावणी होऊन खंडपीठाने वरील प्रमाणे मंजुरी देत अर्ज निकाली काढले शिर्डी येथे श्री साईबाबा मंदिर परिसरातील काही फुल विक्रेत्याकडून होणाऱ्या त्रासामुळे व तेथे तयार झालेल्या गटातटाच्या वातावरणामुळे भाविकांवर खरेदीसाठी दबाव निर्माण केला जात होता. यामुळे गुन्हेगारी वाढत असल्याची आढळून येऊ लागली परिणामी म्हणजे संस्थांच्या तत्कालीन समितीने 2017 मध्ये मंदिर मंदिरात फुले नेणे बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कोविड 2019 ची महामारी सुरू झाली महामारी संपल्यानंतर फुल मंदिरात नेण्याशी प्रकरण समोर आलं. न्यायालयातही फुल विक्रीची संस्था का जबाबदारी स्वतःकडे घेते त्यापेक्षा निविदा काढून विक्री का करत नाही., असा मुद्दा युक्तिवाद मांडण्यात आला होता. मंदिरात फुल अर्पण करण्याबाबत देशातील तिरुपती बालाजी सारख्या वीस मोठ्या मंदिरामध्ये काय पद्धत वापरली जाते. याचा अभिप्राय सादर करावा असे निर्देश खंडपीठाने यापूर्वीच्या एका सुनावणी वेळी दिली होते.

नंतर या संदर्भात या साईबाबाच्या मंदिरात साईच्या मूर्तीला फुले व हार अर्पण करण्यासाठी संस्थांचा कर्मचारी सहकारी संस्थेने मापक दरात ते भाविकांना उपलब्ध करून देण्यासाठी ऍडव्होक समितीने केलेल्या ठरावाला खंडपीठाने मंजूर दिली. तसेच या हार व फुल निर्मलयाच्या योग्य विल्हेवाटासाठी काय पद्धत अवलंबिनात येणार यावरही लवकरात लवकर निर्णय घेण्याची निर्देश दिले.


Post a Comment

0 Comments