नळदुर्ग येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज जाहीर सभा
धाराशिव : महायुतीची तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची गुरुवारी दिनांक 14 रोजी नळदुर्ग येथे सकाळी दहा वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. अक्कलकोट रोडवरील मरीआई मैदानात ही सभा होणार आहे .या सभेत मतदारसंघातील भाजप शिवसेना राष्ट्रवादी रिपाई व मित्रपक्ष महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य तालुकाध्यक्ष संतोष बोबडे शिवसेनेचे जिल्हा सह संपर्कप्रमुख अमर परमेश्वर तालुकाप्रमुख संभाजी पलंगे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, गोकुळ शिंदे, यांनी केले आहे.
0 Comments