परंडा तालुक्यातील दुधी शिवारात बिबट्याने पाडला गाईचा फडशा, ग्रामस्थ सह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
धाराशिव: परंडा तालुक्यातील दुधी गावातील शेतशिवारातील बिबट्याने शेतातील असलेल्या गायीवर हल्ला करून तिचा फडशा पाडल्याची घटना ३० नोव्हेंबर रोजी घडल्याने परंडा तालुक्यातील दुधी गावासह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.. परंडा तालुक्यातील दुधी शिवारात दिनांक २९ रोजीच्या रात्री विनोद जाधव या शेतकऱ्याच्या शेतामध्ये दावणीला बांधलेल्या गायीवरबिबट्याने हल्ला करुन ठार केल्याची घटना ३० रोजी निदर्शनास आली. विनोद जाधव यांनी घटनेची संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्याला कळविण्यात आले त्यानंतर वन विभागाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला़.
0 Comments