Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यात पवनचक्की कंपन्याचा मनमानी कारभार संपेना, होर्टी येथील शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

तुळजापूर तालुक्यात पवनचक्की कंपन्याचा मनमानी कारभार संपेना, होर्टी येथील शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा


तुळजापूर दि .०५- शेतात पवनचक्की बसविण्यास शेतकऱ्याचे विरोध् असुन सदरील पवनचक्की इतरत्र स्थलांतर करावे अन्यथा शुक्रवार दि.20 डिसेंबर रोजी आत्म्दहन करण्याचा इशारा होर्टी ता.तुळजापूर येथील शेतकरी घोडके नामदेव गुंडाप्पा यांनी धाराशिव जिल्हाधिकारी यांना दि.03 डिसेंबर रोजी लेखी निवेदनाव्दारे दिला आहे. 

 या निवेदनात असे म्हटले आहे की तुळजापूर तालुक्यातील होर्टी शिवारात गट नं. 550 मध्ये रिन्यु कंपनीने पवनचक्की बसविण्यासाठी काम चालु केले आहे पवनचक्कीच्या पंख्यामुळे, सावली व हाय पावर होल्टेजमुळे शेतातील पिकांचे नुकसान होणार आहे. याप्रकरणी संबंधीतास विचारणा केल्यास दमदाटी करून काम चालु ठेवले आहे.

माझी जमीन ही पवनचक्कीच्या पुर्व बाजुस असुन माझ्या जमिनीच्या बरोबर सेंटर पाँईट म्हणजे फक्त् 250 ते 290 फुटावर पवनचक्की आहे. त्यातील काही पवनचक्कीचा भाग हा 20 ते 25 फुट इतके माझ्या जमीनीमध्ये येत आहे. पश्चिम बाजुस गट नं.550 व 551 ह्या क्षेत्रात पवनचक्कीचे काम सुरु आहे. याप्रकरणी संबंधितास पवनचक्की फॅनच्या हवेमुळे, हायपॉवर होल्टेज मुळे व त्याच्या सावलीने माझे पिकाचे नुकसान होऊन जनावराच्या जिवितास धोका आहे. त्याकरीता पवनचक्की पाँईट दुसरीकडे स्थलांतर करावे अशी विनंती केले असता दमदाटी करून काम सुरुच ठेवले आहे. आमच्या जिविता संबंधीत गुत्तेदारापासुन धोका असुन आमचे 25 ते 20 गुंटे शेत जमिन आम्हाला विश्वासात न घेता बळकावले आहे.

 याप्रकरणी योग्य् ती चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा अन्यथा दि.20/12/2024 रोजी पवनचक्की पाँईट येथे आत्म्दहन करणार असल्याचे नामदेव घोडके यांनी शेवटी निवेदनात म्हटले आहे.

















बातमी व जाहिरातीसाठी संपर्क मो.9881298946

Post a Comment

0 Comments