Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव तालुक्यातील वर्ग दोन च्या जमिनीवर एक करण्यासाठी दर बुधवारी शिबिर आयोजन

धाराशिव तालुक्यातील वर्ग दोन च्या जमिनीवर एक करण्यासाठी दर बुधवारी शिबिर आयोजन


धाराशिव : धाराशिव तालुक्यातील वर्ग दोन मधील मदतमास जमिनीवर एक मध्ये करण्याचे कामकाज करण्यासाठी तालुकास्तरीय समिती तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे या समितीत सह दुय्यम निबंधक हे सचिव तर जमाबंदी विभागाचे सहाय्यक महसूल अधिकारी व धाराशिव शहराचे मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी हे या समितीचे सदस्य आहेत.

प्रत्येक आठवड्याच्या बुधवारी समितीचे शिबिर सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय धाराशिव येथे आयोजित करण्यात येणार आहे येणाऱ्या बुधवारी दिनांक 25 रोजी ख्रिसमसची शासकीय सुट्टी असल्याने या दिवशीचे शिबिर गुरुवार दिनांक 26 रोजी होणार आहे. या शिबिरात शेतकऱ्यांचा वर्ग दोन मधील जमिनीवर एक मध्ये करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून कोणत्या कागदपत्राची त्यासाठी आवश्यकता लागणार आहे याबाबत माहिती देण्यात येईल याविषयी शेतकऱ्यांनी विचारलेल्या शंकाचे समाधान करण्यात येणार आहे. शिबिरात समितीचे सचिव व सदस्य हे त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या अभिलेखासह उपस्थित राहणार आहेत शेतकऱ्याकडून वर्ग दोन मधील जमिनी वर्ग एक मध्ये करण्यासाठी प्राप्त प्रस्तावाची समिती तपासणी करून परिपूर्ण कागदपत्रांसह जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव दाखल करणार असल्याची माहिती धाराशिवीच्या तहसीलदार डॉक्टर मृणाल जाधव यांनी दिली.

Post a Comment

0 Comments