शिर्डी : साईभक्ता कडून १४ लाखाचा सुवर्ण मुकुट साई चरणी अर्पण साईबाबांच्या सुवर्णमुकुटांची संख्या पोहचली २७ वर
शिर्डी : देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या दानात सातत्याने वाढ होत असून साईबाबांच्या चरणी सुवर्ण मुकुट अर्पण करण्याची परंपरा सुरूच आहे शुक्रवारी इंदौर मध्यप्रदेश येथील साईभक्त जुगल किशोर जैस्वाल आणि पूजा जैस्वाल या दांपत्याने 200 ग्रॅम सोने आणि 47 ग्रॅम चांदी वापरून तयार केलेला 14 लाख 20 हजार रुपयांचा आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकट साईचरणी अर्पण केला.
मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार या मुकुटाच्या अर्पणामुळे साईबाबांना अर्पण झालेल्या सुवर्ण मुकुटांची संख्या 27 वर पोहोचली आहे हा मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण करून संस्थान कडे सुपर्द करण्यात आला आहे.
शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून साईबाबावर देश विदेशातील कोट्यावधी भाविकांची ढळ श्रद्धा आहे भाविकांकडून दान स्वरूपात सोने-चांदी रोख रक्कम आणि अन्य अमूल्य वस्तू साहित्याने अर्पण केल्या जातात जयस्वाल दांपत्याने अर्पण केलेल्या या सुवर्णकुटामुळे साईबाबांच्या दागिन्यांच्या संग्रहात आणखी भर पडली आहे.
या दानांची कृतज्ञता व्यक्त करत श्री साईबाबा (saibaba)संस्थान च्या वतीने बाळासाहेब कोळेकर यांनी जैस्वाल दांपत्याचा सत्कार केला.यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते साईबाबांच्या चरणी भाविकांनी भरभरून दान दिलेले असून सुवर्णमुकुट अलंकार आणि अन्य मौल्यवान वस्तू अर्पण करण्याची ही परंपरा संस्थांच्या संपत्तीला अधिक समृद्ध बनवत आहे भाविकांनी अर्पण केलेल्या प्रत्येक दानाचा समाजासाठी विविध सेवांसाठी उपयोग केला जातो.
0 Comments