Hot Posts

6/recent/ticker-posts

वाल्मीक कराडच्या फ्लॅट आणि जमिनीचा अंदाज लागता लागेना

वाल्मीक कराडच्या फ्लॅट आणि जमिनीचा अंदाज लागता लागेना, दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यावधींची मालमत्ता


सोलापूर: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख(santosh desmukh) यांची हत्या आणि आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात मोका लागलेला खंडणीखोर मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा विश्वासू वाल्मीक कराडच्या संपत्तीचा थांगपत्ता अजूनही लागला नसून बीड पाठोपाठ, पुण्यापासून ते थेट सोलापूर जिल्ह्यातील बार्शीपर्यंत त्याची संपत्ती असल्याचे दिसून आले आहे

आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damaniya)यांनी एका ट्यूट द्वारे असे नमूद केले की वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधव हिच्या नावे सोलापूर जिल्ह्यात देखील कोट्यावधी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती समोर आणली आहे . तो संतोष देशमुख हत्याकांडातील संशयित आरोपी आहे. यापूर्वी बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात ज्योती मंगल जाधव हिच्या नावाने 4 जमिनीचे सातबारा असल्याचे ट्विट सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी केले होते.

वाल्मिक कराड यांच्या संदर्भात रोज कराडचे नवनवीन खुलासे उघड होत आहेत. यापूर्वी ज्योती मंगल जाधव जिच्या नावावर पुण्यात देखील कोट्यावधी रुपयांची संपत्ती खरेदी करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. बार्शीतल्या शेंद्री गावात एकूण चार शेतजमिनी ज्योती जाधवच्या नावे खरेदी करण्यात आले असून त्यांचे क्षेत्रफळ साधारण 35 एकर इतके आहे तर अंदाजे मूल्य हे सुमारे दीड कोटी रुपये इतके आहे.

एप्रिल 2024 ते जुलै 2024 या चार महिन्याच्या कालावधीत ह्या चार ही जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत. या अगोदरही वाल्मीक कराड ची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या यांच्या नावे पुण्यातमध्ये(Pune) दोन ऑफिस स्पेसेस आणि तीन फ्लॅट खरेदी केल्याचं  माहिती समोर आलेलं होतं. त्यानंतर आता सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बार्शीत देखील कोट्यावधी रुपयांची शेतजमीन खरेदी केल्याचे दिसते आहे.

Post a Comment

0 Comments