Hot Posts

6/recent/ticker-posts

जळगावमध्ये सैराट ! प्रेम विवाह केल्याच्या रागातून तब्बल तीन वर्षानंतर घेतला सासऱ्याने जावयाचा बदला

जळगावमध्ये सैराट ! प्रेम विवाह केल्याच्या रागातून तब्बल तीन वर्षानंतर घेतला सासऱ्याने जावयाचा बदला


जळगाव : प्रेम विवाह केल्याच्या रागातून दोन कुटुंबामध्ये वाद सुरू होता तरुणीच्या माहेरच्या मंडळींनी मुकेश रमेश शिरसाठ (राहणार पिप्रांळा हुडको) या तरुणासह त्यांच्या कुटुंबावर धारदार कोयता व चॉपरने वार केले यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मुकेशचा मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबातील सात जण गंभीर जखमी झाले ही घटना रविवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पिंपराळा हुडको परिसरात घडली. जखमीमध्ये मयत तरुणाच्या भावासह ,काका काकू, चुलत भाऊ व बहिणींचा समावेश आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तरुणाचा भाऊ काका यांच्यासह नऊ जनाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. जळगावात सैराट सिनेमाचे पुनःवृत्ती या घटनेत झालेली दिसून येत आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात मुकेश शिरसाट हा तरुण आई-वडील भाऊ यांच्यासह वास्तव्यास होता. तीन ते चार वर्षांपूर्वी त्यांनी त्याच परिसरात राहणाऱ्या पूजा नामक तरुणशी प्रेम विवाह केला होता तेव्हापासून शिरसाठ कुटुंबीय व तरुणीच्या माहेरकडील मंडळींमध्ये वाद सुरू होता.या वादाचे  रूपांतर रविवारी हाणामारीत झाले. रविवारी सकाळी मुकेश हा दुकानावर जाण्यासाठी घराबाहेर आला त्यावेळी पूजेची काका सतीश जुलाल, केदार भाऊ प्रकाश शंकर सोनवणे ,बाबा सुरेश भुताजी बनसोडे, बबलू सुरेश बनसोडे चुलत भाऊ राहुल शांताराम सोनवणे ,पंकज शांताराम सोनवणे, आतेभाऊ अश्विन सुरवाडे, विकी राजू गांगले , बबल्या राजू गांगले यांच्यासह इतर दोन त्या ठिकाणी आले., तुला जास्त माज आला आहे तू पुजाशी  पळून जाऊन लग्न केले आहे तुला व तुझ्या परिवाराला यापूर्वी सोडून दिली आता संपवून टाकू अशी मुकेश ला म्हणत त्यांनी कोयता चॉपरने त्याच्या मानेवर सपासप वार केले त्यात तो रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलीस तक्रार देण्यासाठी जाणाऱ्या वर केला हल्ला

पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाणारे मयताची काका निळकंठ सुखदेव शिरसाट, काकू ललिता निळकंठ शिरसाठ, चुलत भाऊ सनी शिरसाठ व 21 करण शिरसाठ वय 25 चुलत बहीण कोमल शिरसाठ यांना पूजेचे काका सतीश केदार व इतरांनी शिवीगाळ करून कोयता चोपरणे वापरणे हल्ल केला यामध्ये त्यांच्या डोक्याला मानेला पाठीवर पायाला गंभीर दुखापत होऊन वरील सर्वजण जखमी झाले आहेत त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वरील सहाजणांसह सुरेश भुताची बनसोडे वय (50) हे देखील गंभीर जखमी झाला. 

मुकेश शह त्यांच्या कुटुंबावर हल्ला झाल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांसह मित्रांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती उपचार सुरू असताना मुकेशचा मृत्यू झाल्याचे कळताच त्यांच्या नातेवाईकांसह मित्र परिवारांनी एकच आक्रोश केला . या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या पत्नीसह सर्वांना धक्का बसला आहे यावेळी मुकेशच्या आई आईला तो धक्का सहन झाल्याने त्यांना भोळ येऊन त्या बेशुद्ध पडल्या होत्या त्यांना लागलीच जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत..


रात्री धुसफुस आणि सकाळी सशस्त्र हल्ला

मयताचा भाऊ सोनू शिरसाठ यांचा मित्र नकुल मनोहर वाघ वय (20) राहणार पिंपराळा हडको हा शनिवारी रात्री जेवण करून घराबाहेर उभा होता यावेळी अश्विन सुरवाडे, सतीश केदार ,बबलू गांगुले दशिल सतीश केदार यांनी त्या शिवीगाळ करीत तू सोनू शिरसाट सोबत का राहतो असे विचारत मारहाण करीत कोयत्याने वार करीत गंभीर जखमी केली होते या घटनेनंतर मुकेश हा त्यांना समजण्यासाठी गेला होता त्याचवेळी त्यांच्या धुसफुस सुरू होती मात्र सकाळी मुकेशवरच सशस्त्र हल्ला होऊन त्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

एलसीबी कडून पाच तर रामानंद पोलिसांनी केली एकाला अटक

खुनाची घटना घडल्यानंतर एलसीबी चे पथक उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे शेखर डोमाळे विजयसिंह पाटील अतुल वंजारी संजय हिवरकर हरिलाल पाटील रवी नरवाडे विजय पाटील ईश्वर पाटील यांच्या पथकाने तपास चक्र फिरवीत फरार झालेल्या सतीश जुलाल केदार वय 42 प्रकाश शंकर सोनवणे व 29 सुरेश भुताजी बनसोडे वय 47 व रात्री उशिरा एरंडोल येथून अश्विन सुरवाडे यांच्या अल्पवयीन मुलगा अशा पाच जणांना ताब्यात घेतली असून तर रामानंद नगर पोलिसांनी धुळे येथून विशाल उर्फ बबल्या राजू गांगले वय 25 यांच्या मुस्क्या आवळल्या आहेत.

सीसीटीव्ही फुटेज मुळे गुन्ह्यातून बचावला पोलीस

शहरातील एका पोलीस ठाण्यातील कर्मचारी हे मारेकऱ्यांचे नातेवाईक आहेत ही घटना घडल्यानंतर तो पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर असून तो देखील यामध्ये सहभागी असून तो संशयित आरोपींना मदत करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे दरम्यान पोलिसांनी त्या कर्मचाऱ्याबाबत माहिती घेतली असता त्या कर्मचाऱ्यांची रात्रपाळी असल्याने ते पोलीस ठाण्यात हजर होते रात्रीच्या सुमारास वादाची घटना घडल्यामुळे तो पोलीस कर्मचारी ड्युटी संपल्यानंतर देखील घरी न जाता ते पोलीस ठाण्यातच थांबवून होते तसे खुनाची घटना घडल्या वेळी ते पोलीस ठाण्यात आल्याचे पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाली होती त्यामुळे त्या कर्मचारी झालेले आरोप निरर्थक ठरले.

Post a Comment

0 Comments