धाराशिव : श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज आयोजित 'भागीरथी युवा महोत्सव २०२५' उत्साहात संपन्न
धाराशिव : श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज, धाराशिव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'भागीरथी युवा महोत्सव 2025' ची सांगता दिनांक 24 जानेवारी रोजी झाली. या युवा महोत्सवाच्या अनुषंगाने विविध उपक्रम व कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
क्रिकेट स्पर्धा
दिनांक 20 व 21 रोजी कॉलेजच्या मुलांच्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यात अकरावी विज्ञान 'क' तुकडीचा संघ विजयी झाला तसेच दिनांक 23 रोजी कॉलेजच्या मुलींच्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. तिथेही अकरावी विज्ञान 'क' तुकडीचा संघ विजयी झाला.
रस्सीखेच स्पर्धा
दिनांक 21 रोजी घेण्यात आलेल्या मुलांच्या रस्सीखेच स्पर्धेमध्ये अकरावी विज्ञान 'अ' चा संघ विजयी झाला तर मुलींच्या रस्सीखेच स्पर्धेमध्ये अकरावी कॉमर्स चा संघ विजयी झाला.
संगीतखुर्ची स्पर्धा:
दिनांक 22 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या मुलींच्या संगीत खुर्ची स्पर्धेमध्ये प्रथम कु. सानिया सलीम अत्तार, द्वितीय वैभवी युवराज देशमुख व तृतीय कु. यशश्री राम पवार विजय ठरल्या.
आनंद मेळाव्याचे आयोजन
याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मध्ये स्वावलंबन व व्यावसायिक वृत्ती निर्माण व्हावी म्हणून दिनांक 22 रोजी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
निरोप समारंभ:
दिनांक 24 जानेवारी रोजी बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी एका कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्राचार्य श्री. नन्नवरे सर उपप्राचार्य श्री. घार्गे सर, प्रशासकीय अधिकारी श्री. देशमुख सर या विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले तसेच अनेक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच भरोसा सेलचे पोलीस अधिकारी श्री. दिपक पाटील यांनी नियम व शिस्तीचे पालन करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
विविध गुणदर्शन :
या युवा महोत्सवाचा महत्त्वाचा भाग म्हणजे विविध गुणदर्शन कार्यक्रम होय. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सोलो नृत्य, समूह नृत्य व गीतांचे गायन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री. एस. के. कापसे सर आणि प्रा. श्री. कुलकर्णी सर यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागाने केले.
या महोत्सवातील वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी विशेष उपस्थिती म्हणून संस्थाध्यक्ष श्री. सुधीर अण्णा पाटील, सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील, संस्थेचे सीईओ श्री. आदित्य पाटील सर, कॉलेजचे प्राचार्य श्री. एन. आर. नन्नवरे सर, उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे सर, प्रशासकीय अधिकारी श्री. एस.एस. देशमुख सर, संचालक श्री. संतोष कुलकर्णी सर, हातलाई शुगरचे चेअरमन व युवा उद्योजक श्री. अभिराम पाटील सर, फ्लाईंग किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या प्रशासकीय अधिकारी सौ. मंजुळाताई आदित्य पाटील, उपमुख्याध्यापक श्री. प्रमोद कदम सर, 'कला, वाणिज्य व विज्ञान' शाखेचे पर्यवेक्षक श्री. एम. व्ही. शिंदे सर, माजी शिक्षक श्री. पठाण सर, श्री. गाडे सर इत्यादी मान्यवर लाभले. वरील सर्व कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments