एसटी प्रवास आजपासुन महागला! आज पासून एसटी भाडेवाढ लागू -
मुंबई : एसटी महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी 15 टक्के भाडेवाढ करण्याचा राज्य सरकारला सादर केलेला प्रस्ताव शुक्रवार दिनांक 24 जानेवारी रोजी मंत्रालयात राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे आता 14.97% एसटीची भाडे वाढ करण्यात आली असून ही भाडेवाढ शनिवारपासून राज्यभरात लागू होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
सरकारने एसटी प्रवासात ज्या सवलती दिलेले आहेत त्या समिती बंद करण्यात येणार नाहीत त्या समिती सुरूच राहतील महिलांना एसटी तिकिटात 50% नी सूट देखील सुरू राहणार आहे अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
कशी आहेत नवीन एसटीचे दर
एसटी मधून प्रवास करताना प्रति टप्पा सहा किलोमीटर साठी भाडे आकारले जाते साध्या बसचे सध्याचे भाडे 8.70 रुपये आहे ते आता अकरा रुपये असेल जलद सेवा साधारण आणि रात्र सेवा साधारण बस यांचेही भाडे सारखेच असेल शिवशाही एसी बसचे भाडे 12.35 वरून 16 रुपये झाली आहे निम आराम साठी 11.85 ऐवजी 15 रुपये मोजावे लागतील. तसेच शिवशाही स्लीपर साठी एसी 17 रुपये मोजावे लागतील तसेच शिवनेरी एसी भाडे 18.50 ऐवजी 23 रुपये झाले आहे तर शिवनेरी स्लीपर चे भाडे 28 रुपये आहे.
0 Comments