Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर तालुक्यातील दिवटी सलगरा येथील सौ. सुरेखाताई मुळे यांचा जागतिक महिला दिनी होणार सन्मान.

 तुळजापूर तालुक्यातील दिवटी सलगरा येथील सौ. सुरेखाताई मुळे यांचा जागतिक महिला दिनी होणार सन्मान.


""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

वाय.के.सोशल फाऊंडेशनच्या वतीने प्रथमच दिवटी सलगरा येथे होतोय कर्तुत्वान महिलांचा गौरव.

""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

इटकळ ( दिनेश सलगरे ):- तुळजापुर तालुक्यातील मौजे दिवटी सलगरा येथील शिवसेनेच्या तुळजापुर तालुका महिला आघाडी  प्रमुख व सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुरेखाताई मुळे यांचा कर्तुत्वान महिला म्हणून जागतिक महिला दिनी होणार सन्मान. दिवटी सलगरा येथील वाय.के.सोशल फाऊंडेशन मार्फत यावर्षी प्रथमच सलगरा दिवटी गावच्या कर्तुत्वान महिलांचा सन्मान सोहळा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून करण्यात येत असल्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. योगेश केदार व डॉ.तृप्ती  केदार यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. सौ.सुरेखाताई मुळे यांचा गाव परिसरात नेहमीच सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रिय सहभाग असतो म्हणूनच त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचा जागतिक महिला दिनी गौरव करण्यात येत आहे. महिलांना सामाजिक धार्मिक कार्य करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणूनच वाय.के. फाऊंडेशनच्या वतीने हा उपक्रम दरवर्षी राबवनार असल्याचेही ऍड. योगेश केदार व डॉ.तृप्ती केदार यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments