पिस्टलने गोळ्या झाडून काढला काटा लोहारा तालुक्यातील थरारक घटना, तरुणाच्या खून प्रकरणी एकास अटक
लोहारा: तरुणाच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या एका पोलिसांनी शुक्रवारी दिनांक सात रोजी लोहारा येथील न्यायालयात हजर केले यावेळी न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहेत.
![]() |
मयत नितीन आरगडे |
लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द येथील रावण देविदास रसाळ व त्याच्या सावत्र बहिणीचे एका महिन्यापूर्वी कौटुंबिक कारणावरून भांडण झाले होते यावेळी नितीन मधुकर आरगडे हा भांडण सोडवण्यासाठी ते गेला होता. रावण रसाळच्या बहिणीने लोहारा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने रावण यांच्यावरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी नितीन हा साक्षीदार होता याचाच राग मनात धरून रावण रसाळ यांनी नितीनचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले होते त्यानुसार नितीन मधुकर आरगडे राहणार लोहारा खुर्द तालुका लोहारा तरुण शेतकरी गुरुवारी दिनांक सहा रोजी दुपारी आपल्या सोबत शेतात कामाला असलेल्या राम रसाळ यांच्या सह ओढ्यातील विद्युत पंप काढून तलावावर बसवण्यासाठी दुचाकी वर ठेवून जाण्याच्या तयारीत होता यावेळी अचानक समोरून दुचाकीवरून आलेला रावण रसाळ रा. लोहारा खुर्द यांनी राम यास कुठे गेला असे नितीन याने विचारले आला असता माझ्या बहिणीसोबतचे सुरू असलेले भांडण मिटवण्यासाठी प्रयत्न करतो का , तुझ्या पत्नीला लेकरू सुद्धा होऊ देणार नाही आत्ताच तुला उडवतो असे म्हणत रावण ने पिस्टल मधून नितीन वर दोन गोळ्या झाल्या एक गोळी नितीनच्या छातीत लागल्याने नितीन जमिनीवर कोसळला असता रावण यांनी जवळ जाऊन दुसरी गोळी तोंडाच्या हणवटीमध्ये झाडली.
यामध्ये गंभीर जखमी झालेल्या नितीनचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर रावण रसाळ स्वतः लोहारा पोलीस ठाण्यात पिस्टलसह हजर झाला रसाळ सुरुवातीला नितीन सोबत असलेल्या राम यांनी गोळ्या झाडून नितीनचा खुन केल्याचा बनाव केला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांनी स्वतःच्या खुणाची कबुली दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार , लोहारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित चितले, उपनिरीक्षक सचिन केंद्रे विनोद जोकार बीट अमलदार शेवाळे कोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला या प्रकरणी मताचा भाऊ नचिकेत उर्फ खंडू आरगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रसाळ यांचे विरुद्ध गुरुवारी रात्री उशिरा कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शुक्रवारी लोहारा न्यायालयात हजर केली असता न्यायालयाने त्या सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पिस्टल कोठून आणले याचा शोध लावण्याचे पोलिसांना आवाहन
या खुणाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी रावण रसाळ यांनी पिस्टल कोठून व कोणापासून आणले याचा शोध लावण्याचे लोहारा पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे टाकले असून आरोपीला सात दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याने या गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाऊन पिस्टल चा पुरवठा केलेल्यांच्या मुस्क्या आवळून लोहारा तालुक्याचा बिहार व बीड होणार नाही यासाठी लोहारा पोलिसांनी धडक कारवाई करणे आवश्यक असल्याचे नागरिकांतून म्हटले जात आहे.
0 Comments