Hot Posts

6/recent/ticker-posts

Beed: अल्पवयीन मुलीवर अत्याचार आरोपीस २० वर्षे कारवास अंबाजोगाई न्यायालयाचा निकाल, ११ हजाराचा दंड

Beed: अल्पवयीन मुलीवर अत्याचार आरोपीस २० वर्षे कारवास अंबाजोगाई न्यायालयाचा निकाल, ११ हजाराचा दंड


बीड : अल्पवयीन मुलीस चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस दोषी ठरवून वीस वर्षे कारावास व 11 हजार रुपये दंड अशी शिक्षा येथील अप्पर सत्र न्यायाधीश जे खरात यांनी ठोठावली आहे.

विष्णू बाबुराव सादुळे राहणार पोस्ट तालुका अंबाजोगाई असे झालेल्या आरोपीचे नाव आहे. तीन मार्च 2023 रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास अल्पवयीन पीडिता ही शाळेतून घरी आली त्यावेळी तिचा चेहरा उदास दिसल्याने पालकांनी तिला काय झाले असे विचारपूस केली असता तिने पोट दुखत असल्याचे सांगितले त्यावेळी तिला परत विचारले असता तिने पालकांना सांगितले की शेजारी मैत्रिणीच्या घरी खेळत असताना तिथे आरोपी विष्णू बाबुराव सादुळे हा आला पिडीतीला म्हणाला की माझ्यासोबत चल मी चॉकलेट देतो अशी आमिष दाखवत पीडीतेला घरी घेऊन अत्याचार केला हा प्रकार कोणालाही सांगू नकोस नाहीतर तुला जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली.

याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक सुचिता शिंगाडे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपत्र दाखल केले हे प्रकरण सुनावणीसाठी येथील अपर र्न्यायाधीश  श्री खरात यांच्या न्यायालयासमोर सुनावणीसाठी आले सरकारी अभियंता एडवोकेट शिवाजी मुंडे यांनी सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासले पीडीतेचा जबाब व इतर साक्षेपुरावी व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्रह धरून न्यायालयाने आरोपीस कलम सहा बाल लैंगिक अत्याचार कायद्याप्रमाणे वीस वर्षे कारावास व दहा हजार रुपये दंड तसेच कलम 506 भारतीय दंड विधानसहिताप्रमाणे एक वर्ष कारावास व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट शिवाजी वेंकटराव मुंडे यांनी काम पाहिले त्यांना कोर्ट पैरवी म्हणून पोलीस उपनिरीक्षक रमाकांत फड व गोविंद कदम यांनी मदत केली.

Post a Comment

0 Comments