ईटकळ :गेम्स फाऊंडेशन तर्फे कु.सृष्टी दिनेश बंडगर हिस सायकल भेट.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):-जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा इटकळ येथील इ.सहावी वर्गातील विद्यार्थीनी कु.सृष्टी दिनेश बंडगर या विद्यार्थिनीस गेम्स 24 ×7 फाऊंडेशन कडून मोफत सायकल भेट देण्यात आली आहे. जिल्हा परिषद धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा श्रीम नेहा सिंगवी, शिक्षणाधिकारी अशोक पाटील व गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव यांच्या उपस्थितीत मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. सदरील सायकल प्रस्ताव वर्ग शिक्षक श्री सतिश ढोणे सर यांनी केंद्रप्रमुख श्री बळवंत सुरवसे यांच्याकडे दिला होता. या दोघांनीही पाठपुरावा करून सृष्टी बंडगर हिस मोफत सायकलीचा लाभ मिळवून दिले.या सायकल वाटप प्रसंगी शाळेचे प्रतिनिधी म्हणून श्री.रविंद्र गायकवाड सर उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक श्री तानाजी गायकवाड सर यांनी सृष्टी बंडगर हिचा शाळेच्या वतीने सत्कार केला.
0 Comments