सौर ऊर्जेमुळे वीजदर होणार कमी
मुंबई : महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने अर्थात एमईआरसी ने महावितरण ला सौर ऊर्जेच्या माध्यमातून जनरेटर करून प्रति युनिट 2.82 ते 3.10 कमी दराने 700 mw पेक्षा जास्त वीज खरेदी करण्यास मान्यता दिली आहे सौरऊर्जेच्या प्रोत्सानात्मक वापरामुळे विजेचे दर कमी होणार आहेत.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत डिसेंबर 2025 पर्यंत कृषी फीडर सौर उर्जेवर चालवण्याचा प्रस्ताव आहे या प्रकल्पामधून मिळालेली सौर ऊर्जा एमएसईडीएलसी च्या अक्षय खरेदी दायित्वाच्या पूर्तता करण्यास सक्षम असणार असल्याचे वीज नियमाक आयोगाच्या आदेशातही स्पष्ट करण्यात आली आहे. महावितरण च्या माध्यमातून लवकरच सौर प्रकल्पासाठी यशस्वी बोली लावणाऱ्या सोबत वीज खरेदी करार करण्यात येणार असून सौर उर्जेवर आधारित विजेमुळे स्पर्धात्मक वीजदर कमी होणार आहे.
महावितरणच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र हे शेती सौरऊर्जे कडे वळवणारे पहिले राज्य आहे आणि शेत जमिनीसाठी हा जगातील सर्वात मोठा वितरित आर ई प्रकल्प आहे. सात हजार मेगा वेटच्या खरेदी सह राज्य पूर्णपणे 16 हजार मेगावॅट खरेदी करेल ज्यामध्ये पूर्वी 9000 मेगाव्हेट खरेदीसाठी परवानगी देण्यात आली होती. महाराष्ट्र वीज नियमक आयोगाच्या याचिकेत महावितरण अधिकाऱ्यांनी राज्य सरकार विकेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे कृषी ग्राहकांना दिवसा वीज पुरवण्याचा प्रयत्न करते.
हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यातील उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 एम एस के व्ही वाय 2.0 अधिसूचित केली होती जेणेकरून शेत जमिनीसाठी वितरित अक्षय ऊर्जेची जलद खरेदी करता येणार आहे सौरऊर्जेद्वारे वीज खरेदीच्या प्रस्तावित खरेदीमुळे महावितरणच्या वीज खरेदीच्या एकूण खर्चात घट होणार आहे अशा कपातीमुळे औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकावरील क्रॉस सबसिडीचा भार कमी होणार आहे.
0 Comments