संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी उद्या धाराशिव जिल्हा बंदचे आवाहन
धाराशिव : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी दिनांक ५ मार्च रोजी धाराशिव जिल्हा बंदचे आव्हान करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ कॉल समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. काल या हत्या प्रकरणातील काही फोटो समोर आल्यानंतर यातील आरोपीविरोधात तीव्र भावना व्यक्त होत आहेत. दिनांक 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची पवनचक्की खंडणी प्रकरणातून निग्रहण हत्या करण्यात आली होती या प्रकरणी तपास सुरू आहे. काल संतोष देशमुख हत्येतील फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील सर्व संघटना तर्फे जिल्हा बंदची आव्हान करण्यात आले आहे.
नराधमाने केलेल्या हत्येचा निषेध करण्यासाठी या बंदची आव्हान करण्यात आली आहे यामध्ये सर्व जाती-धर्माच्या लोकांनी सहभागी होऊन माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा निषेध करावा अशी आवाहन करण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या
धनंजय देशमुख यांना या हत्त्ये प्रकरणी सहआरोपी करून त्यांच्यावर 302 कलमानुसार गुन्हा दाखल करावा.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व अजित पवार यांनी नैतिकीची जबाबदारी स्वीकारून स्वतः राजीनामा द्यावा.
0 Comments