Hot Posts

6/recent/ticker-posts

Dharashiv-हार्वेस्टरची दुचाकीला धडक तरुण ठार, बलसुर ते उमरगा रोडवरील घटना

Dharashiv-हार्वेस्टरची दुचाकीला धडक तरुण ठार, बलसुर ते उमरगा रोडवरील घटना


धाराशिव : हार्वेस्टरने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली यात वीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला ही दुर्घटना बलसुर ते उमरगा या रोडवर घडली या प्रकरणी 14 मार्च रोजी उमरगा पोलीस ठाण्यात हार्वेस्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, बिहार राज्यातील कुष्णूर येथील छोटू कुमार शर्मा हा तरुण दुचाकीवरून क्रमांक झेड 39 30 बलसुर ते उमरगा या मार्गाने प्रवास करीत होता याचवेळी आशिष अकलू शर्मा (रा.कुसमोरू बिहार) याने आपल्या ताब्यातील हार्वेस्टर क्रमांक-pb 11 डी एच 45 79 निष्काळजीपणे चालवून दुचाकी ला पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात छोटू कुमार हा गंभीर जखमी झाला त्यास तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केली असता, त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी बळीराम नवनाथ सोनटक्के यांनी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यावरून हार्वेस्टर चालका विरुद्ध 14 मार्च रोजी भारतीय न्याय संहिता कलम 279 125 (ब) 106 (1) सह मोटार वाहन कायद्याचे कलम 184 अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments