Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी परिसरात हिंस्र प्राण्याचे प्राण्याचे दर्शन, वाघ दिसल्याची शेतकऱ्यांची माहिती ,दहा ते पंधरा फुटावरून दर्शन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

चिवरी परिसरात हिंस्र प्राण्याचे प्राण्याचे दर्शन,  वाघ दिसल्याची शेतकऱ्यांची माहिती ,दहा ते पंधरा फुटावरून दर्शन  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

प्रतिकात्मक संग्रहित फोटो
चिवरी  : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील मनोज आरगे यांच्या शेताजवळ गुरुवारी दि,१७ रोजी  सायंकाळी  सात ते साडेसात वाजेच्या सुमारास  वाघ सदृश्य प्राण्याचे दर्शन झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे चिवरी परिसरातील  शेतकरी वर्गात,व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मागील दोन महिन्यापासून तुळजापूर तालुक्यातील अनेक भागांमध्ये वाघ बिबट्या अशा हिंस्र  प्राण्यांनी धुमाकूळ घातल्याने तालुक्यातील शेतकरी भयभीत झाली आहेत. 

या घटनेची अधिक माहिती अशी की, चिवरी येथील  शेतकरी मनोज आरगे यांच्या शेताजवळ सायंकाळी सात ते साडेसात दरम्यान वाघ सदृश्य हिंस्र प्राणी दिसल्याचे येथील शेतकरी, मनोज आरगे, सुनील आरगे शांताबाई आरगे बाबुराव शिंदे, विक्रम शिंदे, बिपिन होगाडे,पांडु होगाडे, प्रीतम होगाडे यांनी दहा ते पंधरा फुटावरून हा वाघ पहिल्याचे सांगितले जात आहे. मात्र बिबट्या आहे की वाघ यावरून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या हिंस्र प्राण्याच्या दर्शनाने परिसरातील शेतकऱ्यासह ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे संबंधित वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून तात्काळ या प्राण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थातून होत आहे.

              चिवरी येथील शेतकरी मनोज आरगे यांच्या शेतापाशी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान   हिंस्र प्राणी दिसल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये येथील प्रत्यक्ष दर्शनी पाहिलेल्या शेतकऱ्यांमधून वाघ असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती संबंधित वन विभागाला कळवले असून उद्या घटनास्थळी येऊन पंचनामा करणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. तरी गावातील सर्व शेतकरी बंधू ग्रामस्थांनी यांनी सतर्क रहावे.

    रुपेश बिराजदार पोलीस पाटील चिवरी.

Post a Comment

0 Comments