सोलापुरातील प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेस अटक
सोलापूर: सोलापुरातील प्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवारी रात्री आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. डॉक्टर शिरीष वळसनकर यांचे नाव वैद्यकीय क्षेत्रामध्ये सन्मानाने घेतलं जाते त्याने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, आत्महत्येचं कारण अस्पष्ट होतं दरम्यान पोलीस तपासात डॉ. वळसंकर(Dr.sirish walsankar) यांच्या आत्महत्या प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे.
डॉ. वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे-माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर यांनी एक चिठ्ठी लिहलेली होती, यामध्ये मनीषा मुसळे-माने हिच्यामुळेच टोकाचे पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
डॉ. वळसंगकरांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार हे कागदोपत्रांवरती हवे होते. त्यासाठी त्यांचा आग्रह देखील होता, पण आजकाल रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात होती. यासंदर्भात त्यांनी आक्षेप नोंदवला होता. पण त्यांचं कोणी ऐकत नव्हतं. जी महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती, तिला डॉ. वळसंगकरांनी कामावरून देखील काढलं होतं. पण नंतर या महिला कर्मचाऱ्याने कामावरून काढल्यानंतर आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली होती. तिच्या धमकीवरून डॉक्टरांना पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, डॉक्टरांना ते मान्य नव्हते. या प्रकरणामुळे देखील डॉक्टर तणावाखाली गेल्याचे आणि त्यांनी असं टोकाचं पाऊल उचलल्याचीही चर्चा आहे.ही महिला एका राजकीय पक्षाच्या स्थानिक नेत्याशी संबंधित आहे. तिच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल झाला आहे. डॉ. वळसंगकर यांचे पुत्र, मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. अश्विन वळसंगकर यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार ही कारवाई करण्यात आली.त्यानुसार मनीषा मुसळे माने हिला अटक करण्यात आली. तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आले. न्यायालयात मनीषा मुसळे-माने हिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या चौकशीतून यातील अनेक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे.
0 Comments