Hot Posts

6/recent/ticker-posts

ग्रामीण भागातही विवाह सोहळ्यावर वारे माफ खर्च सामूहिक विवाह सोहळा काळाची गरज

ग्रामीण भागातही विवाह सोहळ्यावर वारे माफ खर्च सामूहिक विवाह सोहळा काळाची गरज


धाराशिव :  सद्यस्थितीत सर्वत्र लग्नसराईचा हंगाम सुरू आहे आता शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातील खर्चिक विवाह सोहळे होत आहेत दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे लग्न साहित्याच्या किमतीही लग्नाला भिडले असून सोने-चांदीच्या दागिन्यावर ही महागाईचे सावट आहे असे असले तरी कर्ज काढून धुमधडाक्यात लग्न सोहळे साजरे केले जात आहेत. त्यामुळे अनेकवर कर्जाचा डोंगर वाढत असल्याची वस्तुस्थिती पहावयास मिळत आहे.

ग्रामीण भागात शेतमजूर व गरीब कुटुंबांना आपल्या मुला मुलींच्या लग्नासाठी दोन पैसे गाठीला जोडावे लागतात परंतु वाढत चाललेल्या महागाईमुळे लग्न सोहळ्यातील वाढलेल्या खर्चामुळे अनेकांना कर्जबाजारी व्हावी लागत आहे. पूर्वी ग्रामीण भागातील विवाह सोहळे कमी खर्चात साध्या सोप्या पद्धतीने पार पडले जात होते अलीकडे ग्रामीण भागातील शहरी थाटामाटाची संस्कृती रूढ होत चालली आहे. लग्न सोहळ्यात मेहंदी हळद पाहुण्यांचा पाहुणचार कपडे स्वागत समारंभ भेटवस्तू बँड बाजा डीजे लाइटिंग एलईडी स्क्रीन व शेवटी मांडव वाढवणे अधिक कार्यक्रमास खर्चाची यादी वाढली आहे.

याशिवाय घोडा केटर्स फेटे डेकोरेशन व्हिडिओग्राफी फोटोग्राफी ड्रोन कॅमेरा शूटिंग खर्च यांची एकूण गोळा बेरीज केली तर खर्च लाखोंच्या घरात जातो. त्यामुळे लग्न थाटामाटात  वेगळ्या पद्धतीने वाजत गाजत झाले पाहिजे. ठीक आहे असा आताच्या तरुण पिढीचा आग्रह घरच्या समोर असतो त्यामुळे सर्वसाधारण घरातील लग्नाचे बजेट वाढत चालले आहे शहरात होणाऱ्या महागड्या लग्नासारखी लग्न अलीकडे ग्रामीण भागातही व्हायला सुरुवात झाली आहे परिणामी आई-वडिलांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

अलीकडे अनेक धार्मिक सामाजिक संस्था, सामाजिक बांधिलकीतून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करतात सर्वांचा खर्च वेळ पैसा व श्रम याची तर बचत होतेच शिवाय सामाजिक संस्थांकडून विवाहित जोडप्यांना संसारा करिता आवश्यक साहित्यही दिले जाते गोरगरीब शेतकरी व सर्वसाधारण पालकांना सामूहिक विवाह सोहळ्यामुळे मोठी मदत होते आर्थिक कर्जबाजारी पासुन वाचवण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याला पसंती देणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.


Post a Comment

0 Comments