तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथे आय.एम.विनर परीक्षेचे आमदार प्रविण स्वामी सर यांच्या हस्ते बक्षीस वितरण.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र संचलित आय.एम.विनर राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा २०२५ चे मौजे इटकळ ता.तुळजापूर येथे उमरगा - लोहारा विधासभेचे लोकप्रिय आमदार प्रविण स्वामी सर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र संचलित आय एम विनर राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा जानेवारी २०२५ मध्ये इटकळ केंद्रातून इ.पहिली ते आठवीच्या एकूण १६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.यात राज्य स्तरावर एक विद्यार्थी, विभाग स्तरावर ४ विद्यार्थी, जिल्हा स्तरावर १२ विद्यार्थी तालुका व केंद्र स्तरावर ४२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले होते. तसेच अणदूर बीट मधील ७ विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालय पात्र , ५ विद्यार्थी एन एम एम एस पात्र विद्यार्थी अशा एकूण ७० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण मा.आमदार प्रविण स्वामी सर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा इटकळ गावचे सरपंच मा.साहेबराव क्षीरसागर हे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायरक्षक ॲड. अमोल गुंड साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी मा.तात्यासाहेब माळी साहेब,शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मा.लालासाहेब मगर सर,सरचिटणीस मा.अविनाश मोकशे सर, गावचे उपसरपंच मा.फिरोज मुजावर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.प्रविण मशाळकर, पोलीस पाटील मा.विनोद सलगरे,माजी सरपंच, मा.राजश्री बागडे मॅडम,तंटा मुक्त समितीचे माजी अध्यक्ष मा.लियाकत खुदादे, मा.महादेव सोनटक्के,ग्रा. पं.सदस्य मा.श्रीकृष्ण मुळे, व्यवस्थापन समितीचे सदस्य मा.अनिल गवळी, मा.दयानंद गायकवाड, मा.राम पाटील,मा.राहुल बागडे, इटकळ केंद्राचे केंद्रप्रमुख मा.बळवंत सुरवसे,पत्रकार मा.दिनेश सलगरे,पत्रकार मा.हैदर शेख, मा.केशवराव गायकवाड, शिक्षक नेते मा.शिवाजी साखरे सर,मा.सुनिल होळकर सर,इटकळ चे मुख्याध्यापक मा.तानाजी गायकवाड, खडकीचे मुख्याध्यापक मा.शेखु जेटीथोर, केशेगावचे मुख्याध्यापक मा.प्रकाश कांबळे, खानापूरचे मुख्याध्यापक मा.दयानंद कांबळे,सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय वाघमारे, नामदेवराव गायकवाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ध्येय प्रकाशन अकॅडमी यांच्या वतीने आमदार प्रविण स्वामी यांना दीपस्तंभ पुरस्कार, विस्तार अधिकारी तात्यासाहेब माळी यांना कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्कार, व श्री.शिवदास भागवत सर यांना राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा.सतिश साखरे सर, मा.राजकुमार कसबे सर, मा.रविंद्र गायकवाड सर, मा.गोरोबा गायकवाड सर, मा. संगिता घुगे मॅडम, मा.वैशाली देशमाने मॅडम, मा.जया भोसले मॅडम, मा.नदाफ मॅडम, मा.संजीवनी पेठे मॅडम कार्यक्रमाचे संयोजक सतिश ढोणे सर यांनी कष्ट घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय प्रकाशन अकॅडमी चे जिल्हा प्रमुख मा.रजनीकांत तुपारे सर यांनी केले, सूत्रसंचलन मा.शिवाजी साखरे सर, मा.महादेव पाटील सर यांनी केले आणि आभार प्रदर्शन मा.नागनाथ बदोले सर यांनी केले. सदरील कार्यक्रमास इटकळ व परिसरातील अनेक मान्यवर,पालक,विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments