Hot Posts

6/recent/ticker-posts

धाराशिव:सैनिक फेडरेशन तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी संभाजी काळजाते यांची निवड

सैनिक फेडरेशन तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी संभाजी काळजाते यांची निवड


⛔धाराशिव /राजगुरु साखरे  : जिल्हा सैनिक फेडरेशन संघटनेच्या जिल्हा व तालुका कार्यकारणीची निवडी सेवानिवृत्त ब्रिगेडियर तथा खासदार सुधीर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली . यामध्ये सैनिक फेडरेशन जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब जावळे यांच्या हस्ते तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी चिवरी येथील माजी सैनिक संभाजी काळजाते यांची तर जिल्हा कायदेविषयक सल्लागार एडवोकेट शमशुद्दीन सय्यद यांची निवड करण्यात आली.दरम्यान निवडी वेळी बोलताना श्री.सावंत  म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यातील सैनिक फेडरेशनचे काम हे अत्यंत चांगले असून महाराष्ट्रातील इतर संघटनांनी आदर्श घेण्यासारखे आहे, सैनिकांना न्याय देण्यासाठी सैनिक फेडरेशन धाराशिव जिल्हा अतोनात प्रयत्न करत आहे ,तसेच माझ्याकडून जे सहकार्य व मदत होईल तेवढी मी शासन दरबारी आक्रमकपणे मांडून सैनिकांना न्याय देईल, असे सांगितले. याप्रसंगी सैनिक फेडरेशन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जावळे, कार्यअध्यक्ष अशोक गाडेकर,तुळजापूर तालुकाध्यक्ष रफिक मुजावर ,भूम तालुका अध्यक्ष हेमंत देशमुख,आदींसह भूम धाराशिव परंडा येथील संघटनेचे पदाधिकारी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments