Hot Posts

6/recent/ticker-posts

औसा- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाजवळवर ट्रॅव्हल्स बसचा भिषण अपघात ,दोन ठार 30 जखमी तर दहा प्रवासी गंभीर

औसा- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाजवळवर ट्रॅव्हल्स बसचा भिषण अपघात ,दोन ठार 30 जखमी तर दहा प्रवासी गंभीर


लातूर : मुंबईहून उदगीर कडे निघालेले एका ट्रॅव्हल्सला उदगीर कडेच निघालेल्या दुसऱ्या ट्रॅव्हल्स ने पाठीमागून जोराची धडक दिली या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अन्य 34 प्रवासी जखमी झाली असून 10 जणांची प्रकृती गंभीर आहे.

ही भीषण दुर्घटना औसा - तुळजापूर महामार्गावर गुरुवारी दिनांक 29 रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली आहे. पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले असा तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील आशिव पाटी येथून काही अंतरावर उदगीरेकडे निघालेल्या कृष्णा ट्रॅव्हल्सला AR 0 1Y 3555 यांनी पाठीमागून येणाऱ्या अभिनव ट्रॅव्हल्स ने एम एच २४ बी डब्ल्यू 12 12 या वाहनाने जोराची धडक दिली यात कृष्णा ट्रॅव्हल्सची बस पलटी झाली.

औसा-तुळजापूर महामार्गांवर आशिव - उजनी दरम्यान दोन ट्रॅव्हल्सचा हा भीषण अपघात झाला. एका ट्रॅव्हल्सच्या समोरचा भाग चक्काचूर झाला. तर दुसरी ट्रॅव्हल्स रस्त्याच्या खाली गेली. या दोन्ही ट्रॅव्हल्स मुंबई ते उदगीर प्रवास करत होत्या. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींना लातूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. ‎घटनास्थळी भादा व हायवे पोलिसांनी दाखल होत पंचनामा केला.

 या बसमधील 34 प्रवासी जखमी झाले तर अभिनव ट्रॅव्हल्स वाहक नामदेव व्यंकटराव सूर्यवंशी वय (40) राहणार अडवाई तालुका पालखी जिल्हा बिदर व नितीन देवराशे राहणार तुर्की तालुका भालकी हे दोघे जागीच ठार झाले.

दीपक मनोहर बिराजदार वय (28) ,रा. तोंडार तालुका उदगीर, रेणुका अर्जुन जाधव वय (45) रा. तालुका औराद , उमाकांत अर्जुन पवार वय (39) रा. चेरा तालुका जळकोट ,अमोल विठ्ठल चौधरी वय (38) राहणार उदगीर ,प्रेमला विश्वनाथ चौले वय 52 राहणार मुंबई, विश्वनाथ दत्तात्री चौरे वय 55 राहणार मुंबई ,सेजल उद्धव टोपे वय 18 राहणार कुर्ला ,पूजा बालाजी तेलंग वय 32 राहणार पुणे, परशुराम अर्जुन जाधव वय 30 राहणार बिदर डॉ.श्वेतांत अशोक डोंगरावरकर वय 38 राहणार उदगीर अशी गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत.

Post a Comment

0 Comments