Hot Posts

6/recent/ticker-posts

दाळिंब येथील माजी पोलीस पाटलाच्या खून प्रकरणाचा 48 तासात उलगडा, एक आरोपी गजाआड दुसऱ्याचा शोध सुरू एलसीबी मुरूम पोलिसांची संयुक्त कामगिरी

दाळिंब येथील माजी पोलीस पाटलाच्या खून प्रकरणाचा ४८ तासात उलगडा, एक आरोपी गजाआड  दुसऱ्याचा शोध सुरू एलसीबी मुरूम पोलिसांची संयुक्त कामगिरी


धाराशिव: उमरगा तालुक्यातील डाळिंब येथील माजी पोलीस पाटीलाचा सोलापूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर दस्तापुर शिवारात डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. याबाबत कोणतीही माहिती नसताना स्थानिक गुन्हे शाखेच्या व मुरूम पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व इतर बाबींचा अभ्यास करून अवघ्या 48 तासात या खुनाचा उलगडा केला आहे. याप्रकरणी गावातीलच एकाला अटक केली असून अन्य एकाचा शोध सुरू आहे. मंगळवारी रात्री उशिरा आरोपीला ताब्यात घेतली आहे त्यांनी खुणाची कबुली दिल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार यांनी सांगितले.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की उमरगा तालुक्यातील डाळिंब येथील पोलीस पाटील समशुद्दीन मियासाहेब पटेल हे रविवारी घरातून बोलेरो जीप घेऊन गेले होते रात्री उशीर होऊनी ते घरी परतले नाहीत दरम्यान सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह अपघातग्रस्त जिपलगतच दस्तापुर शिवारा जवळील एका पुलावर आढळून आला. मुरूम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि अज्ञाता मारी  विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. सतत पडत असलेल्या पावसामुळे खंडित वीज पुरवठ्यामुळे मारेकऱ्यांचा तपास लावण्याची अडचणी निर्माण झाल्या होत्या असे असतानाह पोलीस अधीक्षक संजय जाधव अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना उपाधीक्षक सदाशिव शेलार यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार  सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे, अमोल मोरे ,सचिन खटके यांनी तपासण्याचे सूत्र हाती घेतली कर्मचाऱ्यांच्या पथका समवेत पूर्ण वेळ तपासात झोकुनन दिले .पावसामुळे आणि खंडित विजेमुळे सीसीटीव्ही फुटेज स्पष्ट दिसत नव्हते तरीही प्रयत्नांची पराकष्टा करून पोलिसांनी मारेकऱ्यांचा छडा लावलाच या घटनेत  दाळिंब येथील  दोन तरुण सहभागी असलेचे निष्पन्न झाल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ज्ञानेश्वर भोळे याआरोपीस मंगळवारी रात्री उशिरा जेरबंद केले आहे तर  दुसऱ्या आरोपीचा शोध सध्या सुरू आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव अप्पर पोलीस अधीक्षक शफाअत  आमना यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, एलसीबीचे पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार ,मुरूमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे ,सहाय्य पोलीस निरीक्षक अमोल मोरे ,सचिन खटके ,पोलीस अंमलदार विनोद जानराव, बबन जाधवर ,नितीन जाधवर जावेद काजी ,दयानंद गादेकर ,समाधान वाघमारे चालक विजय घुगे, सुभाष चौरे ,पोलीस स्टेशन मुरूमचा स्टाफ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील स्टाफ यांनी संयुक्तरीत्या ही कामगिरी केली.

तरुण-तरुणीच्या पलायनाचे कनेक्शन?

मयत आणि आरोपींच्या निकटवर्तीय कुटुंबातील एक तरुण जोडपे पळून गेले होते.याच विषयावरून त्यांच्यात वाद झाल्याची चर्चा असून त्यातून खुनाची  घटना घडली असावी असा संशय पोलिसांना आहे.

मयत अन आरोपी होते एकत्र

या घटनेतील महेश समशुद्दीन  पटेल आणि गावातीलच दोन आरोपी रविवारी रात्री एकत्र होते ते एका हॉटेलमध्ये बसल्याचे निष्पन्न झाली आहे. या ठिकाणी त्यांच्या जुन्या विषयावरून वाद झाल्यानंतर पुढे जाऊन आरोपींनी डोक्यात दगड घालून खून केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आली आहे.

Post a Comment

0 Comments