Hot Posts

6/recent/ticker-posts

समर्थ तिरगुळे यांचे दहावी शालांत परीक्षेत 96 ℅ गुण मिळवून घवघवीत यश

समर्थ तिरगुळे यांचे दहावी शालांत परीक्षेत 96 ℅ गुण मिळवून घवघवीत यश

दहावी परीक्षेत ९६% गुण मिळवत शाळा व कुटुंबाचे नाव उज्वल


चिवरी/प्रतिनिधी : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील  जवाहर विद्यालय, चा विद्यार्थी समर्थ शिवशंकर तिरगुळे याने महाराष्ट्र राज्य  माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.

समर्थ हे पत्रकार शिवशंकर तिरगुळे यांचे सुपुत्र असून, त्याच्या या यशामुळे अणदूर परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

समर्थने सर्व विषयांमध्ये उत्कृष्ट गुण मिळवून शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीत आपले स्थान मिळवले. शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे पाठबळ आणि स्वतःची मेहनत यामुळेच हे यश शक्य झाल्याचे तो सांगतो.

जवाहर विद्यालय अणदूर चे मुख्याध्यापक, शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे.या यशाबद्दल   स्थानिक नागरिकांनी व्हाईस ऑफ मिडिया,कै.चंद्रकांत अण्णा धमुरे प्रतिष्ठान, गुणवंत मुळे मित्र मंडळ, पत्रकार दयानंद काळुंके, चंद्रकांत हागलगुंडे,श्रीकांत अणदुरकर, सचिन तोग्गी,संजीव आलुरे,राम भंडारकवठे, सिध्देश्वर मुळे, गंगाधर कबाडे, रामेश्वर कबाडे,अजय कर्पे,राकेश पाटील, त्याचे अभिनंदन केले आहे.

, “दररोज नियोजित अभ्यास, वेळेचे व्यवस्थापन आणि शिक्षक-पालकांचा आधार यामुळे मला हे यश मिळाले. मला युवराज कर्पे व नागनाथ मुळे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे. मी पुढील शिक्षणासाठी विज्ञान शाखा निवडणार आहे.”

                                                      समर्थ तिरगुळे 

Post a Comment

0 Comments