तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथील रहिवाशी श्रीमती वर्षा पाटू यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापुर तालुक्यातील मौजे केशेगाव येथील रहिवाशी श्रीमती वर्षा पाटू यांचा नुकताच लातूर येथे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान.लातूर येथील संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल येथील माध्यमिक शिक्षिका व मौजे केशेगाव तालुका तुळजापूर येथील रहिवाशी श्रीमती वर्षा राजकुमार पाटू यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मानव विकास संस्था लातूरच्या वतीने पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे सहअध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर व लातूर जिल्ह्याचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे व आमदार संभाजीराव भैय्या निलंगेकर यांच्या हस्ते मानव विकास राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला
येथील दयानंद कॉलेजच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री श्री बाबासाहेब पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉक्टर शिवाजी काळगे माजी मंत्री संभाजी भैय्या निलंगेकर भागवताचार्य रमाकांतजी व्यास, गायक अंबरीष महाराज देगलूरकर, मानव विकास संस्थेचे वसंत घोगरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. श्रीमती वर्षा पाटु यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केल्याने गाव परिसरातून कौतुक करीत अभिनंदन केले जात आहे.
0 Comments