Hot Posts

6/recent/ticker-posts

भूमि अभिलेख कार्यालयातील अधिकारी पैसे घेत असतानाचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल , व्हिडिओची सत्यता पडताळून तात्काळ संबंधितावर निलंबनाची कारवाई करावी

 भूमि अभिलेख कार्यालयातील अधिकारी पैसे घेत असतानाचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल,  व्हिडिओची सत्यता पडताळून तात्काळ संबंधितावर निलंबनाची कारवाई करावी - गणेश पाटील अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष निर्मूलन समिती


तुळजापूर प्रतिनिधी :उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथील उपाधीक्षक हे पैसे घेत असताना व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याची सत्यता तपासणी करून त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाही करण्याबाबत या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी उपसंचालक भूमी अभिलेख छत्रपती संभाजी नगर व जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख धाराशिव यांच्याकडे दिनांक 19 मे रोजी निवेदनाद्वारे सदरची मागणी करण्यात आली आहे .

        सदर निवेदनात असे नमूद करण्यात आली आहे कि उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर येथील उपाधीक्षक पदाचा अतिरिक्त कारभार कळंब येथील अधिकाऱ्यांकडे असून तुळजापूर येथील कार्यालयामध्ये उपाधीक्षक हे कार्यालयात आलेल्या व्यक्तींकडून पैसे घेत असताना चा व्हिडिओ फेसबुक,व्हाट्सअप,इंस्टाग्राम,इत्यादी वर वायरल होत असून अधिकारी वारंवार गोरगरीब,शेतकरी,व मोजणी धारक यांच्याकडून पैशाची मागणी करत असल्याची तक्रार नेहमीच चर्चेत असतात.तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ही गेले दीड ते दोन वर्षापासून उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर येथील भ्रष्ट कारभार तसेच कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्याबाबत सातत्याने तक्रारी व आंदोलन करूनही केवळ पैशासाठी संबंधित कसलाही विचार न करता कर्मचारी पैसे मागत असल्याचं या व्हिडिओ मधून दिसून येत आहे .


           तरी अशा भ्रष्ट अधिकाऱ्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले असून या निवेदनावर जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांची स्वाक्षरी आहे .


________________________________________

           उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथील  तुळजापूर येथील अतिरिक्त कारभार कळंब येथील अधिकाऱ्याकडे आहे . काही दिवसापूर्वीच कळम येथील  एका अधिकाऱ्याला लाच घेतानालाचलुचपत प्रतिबंधक खात्याने  रंगेहात पकडले असून तुळजापूर मध्ये उपाधीक्षक भूमी अभिलेख तेथील अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे भ्रष्टाचाराची मुळपाळक किती खोलवर रुजली आहेत ही या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येत आहे .तर अशा अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घातलं जाणार का त्यांच्यावर कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .

____________________________________

         याप्रकरणी प्रभारी अधिकारी उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सदर मोबाईल स्विच ऑफ असल्याचं दिसून आले तसेच यासंदर्भात कार्यालयात कर्मचाऱ्यांकडून मौन पाळले जात असून यासंदर्भात कोणी काहीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाही .


______________________________________________



 

Post a Comment

0 Comments