ग्रामसेवकास धक्काबुक्की करणाऱ्यास २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा, कराड न्यायालयाचा निकाल
सातारा: मोरगिरी तालुका पाटण येथील रवींद्र ज्ञानदेव मिसाळ यास सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोन वर्षे सश्रम कारावास आणि सात हजार रुपये दंड अशी शिक्षा कराड येथील विशेष न्यायाधीश दिलीप पतंगे यांनी ठोठावली आहे. . ग्रामसेवक चंद्रवन साळुंखे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार कराड विशेष न्यायालयात दोषारोपत्र पत्र दाखल झाले होते या कामी अतिरिक्त सरकारी वकील राज शेखर डी परमाज यांनी सरकार पक्षातर्फे खटल्याचे संपूर्ण कामकाज पाहून सदरील गुन्हा दोष सिद्धीस नेला सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले यापैकी फिर्यादी आणि तपासी अधिकार उपविभागीय पोलीस अधिकारी पाटण विभाग विवेक लावंड यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली.
यातील या घटनेची हकीगत अशी की 24 मे 2023 रोजी गावची ग्रामसभा होती त्या ग्रामसभेला कोरम पूर्ण नसल्याने सभा तहकूब करून पुढे ढकलण्यात आल्यामुळे सर्व ग्रामस्थ निघून गेले यानंतर फिर्यादी हे ग्रामपंचायत समोर उभे असताना आरोपी रवींद्र ज्ञानदेव मिसाळ हा येऊन तुम्ही मला वित्त आयोगाची बँक स्टेटमेंट माहिती का दिली नाही असे विचारले तेव्हा फिर्यादी यांनी वित्त आयोगाची माहिती तुमच्या अर्जात नमूद नाही तरीही मी झेरॉक्स काढून देतो असे सांगितले असता आरोपीने फिर्यादीच्या अंगावर धावून जाऊन त्यांच्या हातातील ग्रामसभा प्रोसेसिंग बुक डिस्काउंट त्यातील लिहिलेली पाणी फाडली व त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली . पाटण पोलीस ठाणे येथे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आर डी परमाज यांनी सरकार पक्षातर्फे एकूण 25 साक्षीदार तपसले साक्षी व पुरावा ग्राह्य धोरण महत्वाचा धरून आरोपी रवींद्र मिसाळ यांना दोन वर्षे सश्रम कारावास व सात हजार रुपये दंड दंड न भरल्या सहा महिने साधा करावा अशी शिक्षा सुनावली सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांना दंड रकमेतून नुकसान भरपाई पाच हजार रुपये देण्याचा हुकूम झाला आहे.
0 Comments