Hot Posts

6/recent/ticker-posts

धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवून २६ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवून २६ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल


धाराशिव : नवऱ्याला सोडून राहत असलेल्या एका 26 वर्षीय महिलेला तिच्या गावातील एका तरुणाने लग्नाची आमिष दाखवुन लग्न करण्याचे वचन देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला ही घटना 12 मार्च 2020 ते 22 मे 2025 या कालावधीत घडली. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बेंबळी पोलीस ठाणे येथे दिनांक 17 जून रोजी त्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली  अधिक माहिती अशी की, धाराशिव तालुक्यातील एका गावातील एक 26 वर्षीय महिला ही नवऱ्याला सोडून राहते तिचा नवरा सतत तिच्या सोबत भांडण करीत होता त्यामुळे ती एकटी राहत होती याचा गैरफायदा घेऊन तिच्या गावातील एका तरुणांनी तिला लग्न करण्याचे वचन देऊन तिच्यावर अनेक वेळा वारंवार लैंगिक अत्याचार केला दिनांक 12 मार्च 2020 ते 22 मे 2025 या कालावधी तिच्यावर वारंवार अत्याचार केला पोलिसात तक्रार केली तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली. लग्नास व तिला सांभाळण्यास त्यांनी नकार दिला. याप्रकरणी पिडीतिने दिनांक 17 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून भारतीय न्याय संहिता कलम 69 351 (2)(3) अन्वे बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments