/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> घरात घुसून महिलेवर अत्याचार चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल धाराशिव जिल्ह्यातील घटना

Hot Posts

घरात घुसून महिलेवर अत्याचार चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल धाराशिव जिल्ह्यातील घटना

घरात घुसून महिलेवर अत्याचार चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल धाराशिव जिल्ह्यातील घटना


धाराशिव : मध्यरात्रीनंतर घरात शिरून जातीवाचक शिवीगाळ  करत मारहाण करून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी चौघांच्या विरोधात आंबी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना १३ मे रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास भूम तालुक्यातील एका गावात घडली आहे.

 याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 55 वर्षीय पीडित महिला घरात एकटी झोपलेली असताना गावातीलच चार आरोपींनी तिच्या घरात घुसून जातीवाचक शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करत अत्याचार केल्याची तक्रार महिलेने दिली आहे त्यानुसार या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 64 (1) 74 333 115 (2) 352 351 (2) 351 (3) 3 (5) यासारख्या गंभीर कलमाखाली तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमानुसार आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments