जमिनीची फेरफार नोंद करून देण्यासाठी २५०० रुपयाची लाच स्वीकारताना तलाठी रंगेहात अटक बीड एसीबी ची कारवाई-
बीड प्रतिनिधी: रुपेश डोलारे: खरेदी केलेल्या जमिनीची फेरफारला नोंद करून देण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी आष्टी तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी तलाठी रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी बीड एसीबी पथकाच्या पथकाने बुधवारी दिनांक 23 रोजी डोईठाण येथे ही कारवाई केली.
याबाबत एसीबी कडून मिळालेली अधिक माहिती अशी की अशोक रघुनाथ सुडके वय (48) राहणार कोरडगाव जिल्हा अहिल्यानगर आणि खाजगी व्यक्ती बाबुराव रावसाहेब शिरसागर वय (54) राहणार डोईठाण तालुका आष्टी या दोघाविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला . याबाबत एका तक्रारदाराने बीड एसीबी कडे तक्रार नोंदवली होती तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीवरील बोजा सातबारावरून कमी करायचा होता तसेच तक्रारदाराच्या स्वतःच्या नावे 14 जुलै रोजी खरेदी केलेल्या जमिनीची फेरफारला नोंद करायची होती हे काम करून देण्यासाठी प्रत्येक कामाची दीड हजार रुपये प्रमाणे 3000 रुपयाची लाच मागणी सुडके यांनी केले, तडजोडी अंती अडीच हजार देण्याचे ठरवले मात्र तक्रारदाराला लाच देणे योग्य वाटत नव्हती त्याने याची तक्रार एसीबी कडे दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने बुधवारी एसीबीने डोईठाण येथील सुडके यांच्या कार्यालयात सापळा रचला असत तिथे शासकीय पंच व साक्षीदारासमक्ष तक्रारदाराकडून अडीच हजार रुपयाची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले याप्रकरणी आरोपी ग्राम महसूल अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एसीबी पोलीस करत आहेत. या महसूल विभागामध्ये वाढत चाललेल्या लाचखोरी प्रकरणामुळे महसुली विभागाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड कधी संपणार ? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
0 Comments