Hot Posts

6/recent/ticker-posts

जिवंत व्यक्तींना दाखवले मृत पावणे सात लाख रुपये हडपले बांधकाम कामगार अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर फसवणूक उघड जालना जिल्ह्यातील प्रकार

जिवंत व्यक्तींना दाखवले मृत पावणे सात लाख रुपये हडपले बांधकाम कामगार अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर फसवणूक उघड जालना जिल्ह्यातील प्रकार


जालना : जिवंत व्यक्तींना मृत दाखवून बनावट कागदपत्र तयार करत त्याला बांधकाम कामगार दाखवून त्याच्या बनावट मृत्यू प्रमाणपत्राचे आधारे सहा लाख 78000 चे अनुदान लाटल्याचे प्रकरण जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात उघडकीस आले आहे.  दरम्यान या प्रकरणी दक्षता पथकातील छत्रपती संभाजीनगरचे सरकारी कामगार अधिकारी गोविंद गावंडे यांच्या फिर्यादीवरून मंठा पोलीस ठाण्यात तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की कामगार उपायुक्त गावंडे यांनी दिल्या माहितीनुसार मंठा तालुक्यातील आकणी येथील स्वाती शिवाजी उबाळे ,देवराव नारायण बदर ,दुर्योधन रामभाऊ जाधव या तीन व्यक्तीच्या कागदपत्राची पडताळणी करण्यासाठी फिर्यादी व सोबत दक्षता पथकातील कर्मचारी प्रत्यक्ष गेले होते; त्यावेळी ग्रामसेवक खेडकर यांनी सांगितले की वरील तिघेही जण आखणी गावचे रहिवासी नसून त्यांना कार्यालयातर्फे मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. चौकशीतील अधिकारी यांनी कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की वरील तिन्ही व्यक्तीचे नातेवाईक यांनी बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची व मंडळाची दिशाभूल केली तसेच मयत कामगाराच्या वारसाला देण्यात येणारे अर्थसाह्याची रक्कम सहा लाख 78 हजार रुपये लाटले आहेत सदर नातेवाईक व दलालांनी ग्रामपंचायतचे सही व शिक्के बोगस वापरून ही दिशाभूल करत भ्रष्टाचार केला आहे. याप्रकरणी मंठा पोलिसात शिवाजी लक्ष्मण उ उबाळे, कमल देवराव बदर ,तेजस दुर्योधन जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संतोष माळगे तपास करत आहेत.

शिष्यवृत्तीची ही चौकशी व्हावी

मंठा शहरासह तालुक्यात बांधकाम कामगार नोंदणी करण्याकरता दलाल आणि व ऑनलाईन सेवा केंद्र धारकांनी मोठी लूट चालु केली आहे. यात मंठा शहरातील देवी रोडवरील वाटुर येथील एका दलालीने सेवा केंद्रावर व मंठा शहरातील काही दलाल यांनी जास्तीत जास्त पैसे घेऊन त्यांच्या आधार कार्ड मध्ये फेरबदल करून नोंदणी केली आहे या सर्व बाबींची चौकशी करण्यात यावी व यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी शहरातील नागरिकांतून होत आहे मंठा शहरासह तालुक्यात लाखो लोकांनी बनावट कामगार ऑनलाईन नोंदणी करून अनुदान व कामगारांच्या पाल्याची शिष्यवृत्ती लाटली आहे याचीही चौकशी मागणी सुजाण नागरिकांतून  होत आहे.

Post a Comment

0 Comments