जगदंबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप

Hot Posts

6/recent/ticker-posts

जगदंबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप

धाराशिव: जगदंबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप 


धाराशिव प्रतिनिधी: श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज, धाराशिव येथे विज्ञान शाखेमध्ये जेईई व एनईईटी (NEET) परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी ‘फिजिक्सवाला’चे वर्ग चालू आहेत. या वर्गातील गुणवंत तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना जगदंबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शिष्यवृत्ती देण्यात आली. ही शिष्यवृत्ती आदर्श शिक्षक प्रसारक मंडळाचे संचालक श्री. बी. जी. जाधव यांच्या जगदंबा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कु. प्राची जाधव, कु. प्रांजली कोळी, कु. शिल्पा पवार व ओम जाधव या विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली. मागील दोन वर्षांपासून श्री. बी. जी. जाधव हे या ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सातत्याने मदत करत आहेत. यंदाही ट्रस्टतर्फे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण फी संस्थाध्यक्ष श्री. सुधीर अण्णा पाटील यांच्या स्वाधीन करण्यात आली. डॉ. रत्नदीप बाजीराव जाधव हे या ट्रस्टचे अध्यक्ष तर श्री. अमोल यादव व सौ. वनमाला बाजीराव जाधव सदस्य आहेत. या प्रसंगी संस्थाध्यक्ष श्री. सुधीर अण्णा पाटील, सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील, संस्थेचे सीईओ श्री. आदित्य पाटील, मुख्याध्यापक श्री. एन. आर. नन्नवरे, उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे, पर्यवेक्षक श्री. एम. व्ही. शिंदे तसेच फिजिक्सवाला विभागप्रमुख श्री. ए. व्ही. भगत उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments