निवडणुकीचे बिगुल वाजले! जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी मतदार यादी जाहीर; हरकती व सूचना दाखल करण्याची ‘हा’ असेल कालावधी
मुंबई/प्रतिनिधी रुपेश डोलारे : राज्यातील 32 जिल्हा परिषद व 336 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी मतदार यादी चा कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद पंचायत(ZP Election) समितीसाठी मतदान होण्याची शक्यता आहे राज्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका(Mahanagarpalika) सह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 रोजी पर्यंतच्या मतदार यादी नोंदणीचा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकींसाठी वापरण्यात येणार आहे.
मतदार यादीच्या आता जाहीर कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादीवर 8 ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील जिल्हा परिषद(ZP Election) निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनीय प्रारूप मतदार यादी मतदार यादी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल त्यावर 14 ऑक्टोबर पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील अंतिम मतदार यादी व मतदान केंद्रनिहाय(Centrewise) मतदार यादी 27 ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाईल राज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Election) पहिला टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची(Panchyat Samiti) निवडणूक होईल. 27 ऑक्टोबरला गणनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यानंतर आयोग जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करेल साधारणपणे 1 नोव्हेंबर च्या आसपास निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन आचारसंहिता लागू होईल त्यानंतर 35 दिवसात म्हणजेच 5 ते 10 डिसेंबरच्या (Desmber) दरम्यान जिल्हा परिषद पंचायत समिती साठी मतदान होईल अशी शक्यता व्यक्त होत आहे.
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मतदान शक्य
दुसऱ्या तब्येत नगरपंचायत नगर परिषदांसह राज्यातील सर्व 29 महानगरपालिकांसाठी मतदान होईल राज्यातील एकूण 147 नगरपंचायती पैकी 42 नगरपंचायतीच्या निवडणूक होईल तर राज्यातील सर्व 248 नगरपरिषदांची निवडणूक होणे बाकी आहे निवडणूक होणाऱ्या नगरपंचायत व नगरपरिषदांची एकूण 300 च्या घरातील संख्या पाहता महानगरपालिका (Muncipal)निवडणुकांच्या आधी काही दिवस त्यासाठी मतदान होण्याची शक्यता आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात नगरपंचायत नगरपरिषदेसाठी तर शेवटच्या आठवड्यात महानगरपालिकांसाठी मतदान होण्याची शक्यता आहे
राज्य निवडणूक आयोगाकडे सध्या ईव्हीएम (EVM Machines)मशीनची कमतरता आहे उपलब्ध आहेत निवडणुकीपूर्वी आणखी 20 हजार मशीन्स खरेदी करण्यात येणार आहेत त्यासाठी ऑर्डर(order) देण्यात आली आहे राज्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडण्यासाठी आयोगाला सुमारे पावणे दोन लाख मशीन लागणार आहेत त्यासाठी साधारणपणे एक लाख मशीन्स मध्य प्रदेश राज्य निवडणूक आयोगाकडून भाडेतत्त्वावर घेणार आहे त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने या आयोगासोबत करार सुद्धा केला आहे

0 Comments