शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता या तारखेस जमा होणार शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली!-Namo Shetkari Yojna Fix Date seventh Installment

Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता या तारखेस जमा होणार शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली!-Namo Shetkari Yojna Fix Date seventh Installment

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता या तारखेस जमा होणार शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली!-


मुबंईराज्यातील ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’च्या (Namo Shetkari Maha Sanman Nidhi Yojana) सातव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने यापूर्वीच हप्त्यासाठी निधी मंजूर केला असला तरी, वितरणाची नेमकी तारीख जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र, आता स्वतः कृषीमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या ९ सप्टेंबर २०२५ पासून या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

कृषीमंत्र्यांच्या घोषणेने शेतकऱ्यांना मोठा दिलासा

राज्य शासनाने ३ सप्टेंबर रोजी या हप्त्याच्या वितरणासाठी १९३२ कोटी ७२ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देणारा शासन निर्णय (GR) निर्गमित केला होता. मात्र, पैसे नेमके कधी जमा होणार याबाबत स्पष्टता नव्हती. अखेर कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांनी स्वतः तारीख जाहीर केल्याने शेतकऱ्यांमधील संभ्रम दूर झाला आहे. हा हप्ता एप्रिल ते जुलै या कालावधीसाठीचा असून, तो मिळण्यास आधीच विलंब झाला होता. सणासुदीच्या आणि शेतीच्या कामांच्या तोंडावर ही रक्कम मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाली आहे .

Post a Comment

0 Comments