पूरग्रस्तांच्या मदतीला धावले श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपये देण्याचा निर्णय , तर पूरग्रस्त महिलांसाठी १००० साड्यांचे वाटप-
तुळजापूर प्रतिनिधी /रुपेश डोलारे: मागील काही दिवसापासून राज्यभर मुसळधार पावसाने कहर केला आहे त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरशा पावसाने थैमान घातली असून अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच अनेक कुटुंबी बेघर झाली आहेत. या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे व परंडा तालुक्यातील पूरग्रस्त भागातील महिलांसाठी 1000 साड्यांची वाटप करण्यात आले आहे.
याशिवाय अजूनही मंदिर संस्थांच्या वतीने विविध प्रकारचे मदत कार्य सुरू राहणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय साधून पूरग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक ती मदत वेळोवेळी पुरविण्यात येत आहे असे जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थांचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजा स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान हे भाविकांनी दिलेल्या देणगी वर चालते भाविकांनी मंदिर संस्थान यांचे अतूट नाते आहे हाच धागा जपत संस्था नियमित सामाजिक बांधिलकी पार पाडत आले आहे राज्यात कुठेही नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास मंदिर संस्थान आपत्तीग्रस्तांच्या मदतीला धावून येते.
तसेच याआधीही कोल्हापूर परिसरातील महापुराच्या काळात मंदिर संस्थांच्या वतीने पूरग्रस्तांना अन्नधान्य किट पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तसेच महिलांना साड्याची वाटप करण्यात आले होते. पुण्यातील महापुरा वेळीही मंदिर संस्थाने मदत कार्य केले होते तसेच 2019 मध्ये पूरग्रस्तांसाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 25 लाख रुपयांची देणगी दिली होती. आता धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेले आहेत घरांची पडझड झालेली आहे पिकांचे नुकसान झालेले आहे जनावरे वाहून गेलेले आहेत अशा गरजू शेतकऱ्यांना मदतीसाठी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थाने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संपर्कात राहून मदत कार्य करण्याचे नियोजन करत असल्याचे सांगितले आहे.
याचबरोबर भाविकांप्रती आणि समाजाप्रती असलेली ही बांधिलकी कायम ठेवत आजही तुळजापूरचे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान पूरग्रस्त कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे देवीच्या भक्तांशी असलेले भावनिक नाते जपत मंदिर संस्थान नेहमीच संकटाच्या काळात समाजासाठी तत्पर राहिले आहे. तसेच आजही तेच धागे पुन्हा घट्ट विणले जात आहेत. पूरग्रस्तांच्या दुःखात सहभागी होत श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान त्यांना आधार देत आहे समाजाप्रती असलेली ही निरंतर बांधिलकी आणि देवीच्या भक्तांची असलेले भावनिक नाते मंदिर संस्थान नेहमीच जपत आले आहे आणि पुढे जपत राहील असे मंदिर मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री कीर्ती किरण पुजार यांनी म्हटले आहे.देव माणसातच आहे. देवत्वाची प्रचीती ही संकटसमयी एकमेकांच्या मदतीला धावून जाण्यातूनच येत असते. याचीच अनुभूती शनिवारी दिनांक 27 रोजी तुळजाभवानी मंदिर संस्थानाने ( Tulja Bhavani Temple ) आणून दिली आहे या घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

0 Comments