हृदयद्रावक घटना : अतिवृष्टीमुळे नुकसान, हाता- तोंडाशी आलेला घास हिरावला तरुण शेतकऱ्यांनी कर्जाच्या विवेचनेतून गळफास घेऊन केली आत्महत्या -बार्शी तालुक्यातील घटना
सोलापूर / प्रतिनिधी रुपेश डोलारे: मागील पंधरा दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात होत असलेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पावसामुळे कहर केला आहे यामुळे(Solapur Rain) नदी, नाले, ओढे, तलाव तुडुंब वाहत आहेत. या वाहत असलेल्या पाण्याने जिल्ह्यातील अनेक गावांना वेढा घातला आहे. हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. तर जिल्ह्यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातच आता बार्शी (Barshi) तालुक्यातील कारी या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाल्यामुळे एका शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना समोर आली आहे. ही आत्महत्येची घटना गुरुवारी दिनांक 24 सप्टेंबर रोजी घडली या कारी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान आणि कर्जफेडीची असह्य विवंचना या आत्महत्यांमागचं (Suicide)प्रमुख कारण असल्याचं कुटुंबीय आणि शेजाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. बार्शी(Barshi Taluka) तालुक्यामध्ये सलग पाऊस पडत आहे शेतात पाणी साठवून राहिले आहे, या पिकातून दमडी हातात पडणार नाही मग जगायचे कसे? अशी चिंता सतावू लागली आणि या चिंतेतून एका शेतकऱ्याने(Farmers Suicide) आत्महत्या केल्याची घटना कारी येथे घडली आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार कारी (ता बार्शी) येथील तरुण शेतकरी शरद भागवत गंभीर (वय ३९) याने घराजवळ असणाऱ्या शेलवटीच्या झाडाला(Trees) गळफास घेऊन जीव संपवले. शेती खर्चासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचंय या विवंचनेत शरद होता. परिणामी त्याने बुधवारी सकाळी घराजवळ असणाऱ्या शेलवटीच्या झाडाला गळफास घेतला. याबाबतची फिर्याद चुलत भाऊ गजानन गंभीर याने पांगरी पोलीस स्टेशनमध्ये (Pangari Police Station) दाखल केली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल माने हे करत आहेत.
मुलगी श्वेता न मांडली सोशल मीडियावर वडिलांची व्यथा(Sweta Girls sociallmedia Fathers imotional video)
मयत शरद गंभीर यांच्या अकरा वर्षाच्या लहान मुलीने एका व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर आपल्या वडिलांच्या व्यथा मांडले आहेत ........माझ्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधी धाराशिवला घेऊन जायलेले पण मीच नको म्हणलेलं मी पैसे आल्यावर जाऊ म्हणलेलं त्यांच्याकडे पैसे नव्हतं कर्ज काढून सगळं पैसे शेतात घातल्या ते संपलं म्हणून खाजगी सावकाराकडून पैसे घेतले ते पण शेतात गेल आणि शेतातील पीक पाण्यात गेले त्यांना सारखं फोन यायचा आमच्या गळ्यात पडून रडायचा पण काही सांगत नव्हता अशी मन हेलावून टाकणारी व्यथा कारी तालुका बार्शी येथील आत्महत्या केलेल्या शरद गंभीर यांची अकरा वर्षाची मुलगी श्वेता येणे सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून मांडली आहे.

0 Comments